Wednesday, May 21, 2008

नसतेस घरी तू जेव्हा ... ( विडंबन )

नसतेस घरी तू जेव्हा ... ह्या संदीप खरे ह्यांच्या नितांत सुंदर गाण्याचे.. मी विडंबन केले आहे.. तेव्हा प्रथम त्यांची माफ़ी मागतो .
आज सकाळीच त्या गाण्याची लिखीत प्रत माझ्या ईमेल वर आली.. ती वाचतांना जे सुचत गेले ते लीहीत गेलो. कूणास दुखवीण्याचा हेतू नाही.. एक आनंद म्हणून बघावे ही सगळ्याना विनंती ....
क्षमस्व..
-----------------------------------

मुळ काव्य:

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तूटका तूटका होतो
जगण्याची विरती धागे
संसार फ़ाटका होतो..

नभ फ़ाटून वीज पडावी
कल्लोळ तस ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसूनी जाती मागे
खिडकीशी धबकून वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघव वेळा
श्वासावीन ह्रुदय अडावे
मी तसाच अगतीक होतो

तु सांग सखे मज काय
मी सांगू ह्या घरदारा
समईचा जीव उदास
माझ्यासह मिण मिण मिटतो

न अजूनी झालो मोठा
न स्वतंत्र अजूनी झालो
तुजवाचुन उमगत जाते
तुजवाचुन जन्मच अडतो

----------------------------------------

असतेस घरी तू जेव्हा
जीव धडका धडका भरतो
हिमतीचे विरती धागे
जीव बार फ़ुसका होतो ...

वस्तू लागून काच फ़ूटावी
आवाज रोजचाच येतो
ही भांडी दिशाहीन होता
अन पती मारका होतो

येतात पाहूणे दाराशी
हिरमूसूनी जाती मागे
खिडकीशी गाव तो सारा
तव गूण पसरवत जातो

तव मूठीने मिळणार्‍या
मज खुपती जाचक खूणा
मुख दाबून बुक्के पडावे
मी तसाच स्तंभीत होतो

ते सांग देवा मज काय
मी सांगू ह्या जगताला
एकला मी न उदास
हरएक रोज रोज पीटतो

न थांबला तो तंटा
न मी चीत अजूनी झालो
तीलाच आवरत जातो
दिनरात कसेसे लोटतो

--
मंदार हिंगणे
२१/०५/२००८

Thursday, May 15, 2008

माझ्या चारोळ्या - माझ्याच आरोळ्या !! :-) - ( २ )

माझ्या चारोळ्या ...
......... माझ्याच आरोळ्या
माझ्या ह्या वेडेपणालाही
...... माझ्याच टाळ्या ..
-------------------------------------
काल रात्री एका वादळाने
माझे शब्द उडऊन नेले होते ।
दमुन भागून आज तेच
माझ्या झोपडीतच झोपले होते ।
-------------------------------------
आलचं जर डोळ्यात पाणी
तरं "हारला हा" म्हणुन दैव सुखावेल;
म्हणुन मनात असुन सुद्धा
मला मोकळेपणाने रडता येत नाही
---------------------------------------
अश्रु आठवणींचे डोळ्यात दाटुन येतात,
तरी ओठांवर हसु पेरावे लागते ।
ही मुहोब्बत पण काय चिज आहे दोस्ता
जिच्यावर करतो तिच्यापसुनच लपवावी लागते ।
------------------------------------------
आठवणींनी कितीही काहूर माजविले तरीही
आता भावना आवरायचं जमतयं ।
कितीहीवेला रेतीवरचे नाव पूसले सागराने तरीही
आता त्याच्याशी मैत्री करणे जमतयं ।
--------------------------------------------
आज सगळी उत्तरे आहेत
पण आता कुठलाच प्रश्न नाही ।
रडणे तर अता रोजचेच आहे
पण डोळ्यात पाणी नाही ।
-------------------------------------------
जर तुला रडु आलं तरं
दोन थेंब अश्रुचे माझ्या राखेवरती गळु देत ।
मरण माझं वाया नाही गेलं
हे जरा "त्या" जगाला तरी कळु देत ।
-------------------------------------------
कसे सांगु मी की तीला भेटण्याची आस नाही ;
आठवणींच्या डोहातल्या ह्रुदयास आजही आराम नाही ।
विसरून जावे तीला अताशा, पण काय करु दोस्ता ;
विसरावे कुणाला ह्या दिलाचा दस्तुर नाही ।
-------------------------------------------
दु:खात हसणारे कधी रडत नाही ;
लाटांपासुन पाणी वेगळे होत नाही ।
होणारे स्व:ताहून आपले असतात;
कोणी सांगून "आपले" होत नाही
------------------------------------------
समजाऊन सांग तुझ्या आठवणींना
त्या न बोलावताच येत असतात ।
तु तर दुर रहून सतवत असतेस ;
त्या जवळ येऊन रडवत असतात ।
-------------------------------------------
आज लब्जोंनेभी हमसे बडी साजीश कि ;
हमारी शायरी को छोड अफ़सानोंसे दोस्ती कि ।
रुसवां है हमारी यादे हमारेही उल्फ़त कि;
आज तनहाई भी करने लगी सदके उन्ही की राहों कि ।
--------------------------------------------
अब इससे ज्यादा इन्तेहां इंतजार की क्या होगी ;
आखें खुली थी ओर हमे दफ़नाने की रस्म अदा हुई थी ।
--------------------------------------------
वेळ जात होता, धडकन थांबत होती
हसत होतो मी पण डोळ्यात आसवे होती ।
साथीला माझ्या तर सारा जमाना होता;
पण न जाणे का तुझीच गरज होती
------------------------------------
का तुकडे केलेस ह्रुदयाचे असे,
तुझ्या आठवणीत आसवेही सुकुन गेली।
तुझ्यावर प्रेम केले इतकीच का चूक होती?
का तू माझ्या आयूष्यात दर्द देउन गेली।
------------------------------------
मी तो जज्बा..जो बनून ह्रुदय धडकतो
मी तो सूगंध... जो मिठीत परीमळतो
मजवर असा जीव नको लाउस ग
मी तो दर्द ... जो डोळ्यातून ओघळतो..
------------------------------------
दुखानी हसू न दीले कधी..
जगाने रडू न दीले कधी...
प्रश्नानी जगू न दीले कधी,
थकून चांदण्यात पहूडलो जेंव्हा..
आठवानी तूझ्या झोपू न दीले कधी ....
------------------------------------
कसे तुला सांगू "एकांत" तो कसा
त्या पानगळीला विचार "विरह" तो कसा।
उगाच फ़सवांचा आरोप का देतेस ?
विचार तु काळालाही -
तुझी आठवण न आली तो "क्षण" कसा!
--------------------------------------------
आयुष्य अल्लड......म्हणून मी शांत आहे
असंख्य जखमांचे देणे....म्हणुन मी शांत आहे।
सांगावी म्हणतो जगाला कहाणी माझी;
येइल त्यात तुझे नाव..म्हणून मी शांत आहे।
-----------------------------------

मंदार हिंगणे

माझ्या चारोळ्या .... माझ्याच आरोळ्या !! :-) - ( १ )

माझ्या चारोळीच्या चारही ओळी,
तिनेच मला शिकविल्या ।
दोन ओळी ती गुणगुणली
आणि दोन मी तिच्या डोळ्यात वाचल्या ।
------------------------------------------------------------
जपत किनारा शिड सोडु नकोस
अन वार्याची वाट पाहू नकोस ।
तु ठरव दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटांवर झुलु नकोस ।
-------------------------------------------------------
भाव डोळ्यातील कधीतरी उलगडतील
स्पर्शातून, गाण्यातून वा एखाद्या कवितेतून ।
ते तुझ्या अस्तित्वाचे पुरावे आहेत ;
मांडु देत हा प्रपंच निदान ह्या आशेवरून ।
------------------------------------------------------
देशील का माझ्या हातात तुझा हात ?
शपथ घेतो देईन अखेर पर्यंत साथ ..
मी तुझा अन तू माझी राहू ना असे
जसे जळताना एकरूप दिसे तेल आणि वात
------------------------------------
प्रेमात शब्दांना महत्व नसते ....
दाटल्या भावनांना काही बंध नसते...
डोळेच सांगून जातात हाल ह्रुदयाचे ...
होकाराला शब्दांची गरज नसते ...
------------------------------------
माझ्या प्रेमाला लपऊ कसे ?
दिलाच्या धडकण्याला थांबऊ कसे ?
आज पून्हा मज भेटून ती गेली;
पण मनातल्या भावनांना आवरू कसे ?
------------------------------------------
प्रेमात साथ तर प्रत्येक क्षणांची असते
कोणी दाखवतो..... कुणी लपवीतो ।
मजा खरी तर तेंव्हाच येते दोस्ता;
विरहाचा क्षण जेंव्हा जवळ येतो ।
------------------------------------------
प्रेम जर सुख!.. तर आपण का दुखावतो ?
प्रेम जर पाणी!.. तर आपण का जळतो?
प्रेम जर उब!.. तर आपण का थरथरतो ?
प्रेम जर आनंद!.. तर आपण का रडतो?
प्रेम जर शाश्वत!.. तर आपण का मरतो ?
म्हणुन ....
प्रेम हे प्रेम असावे. ती मजबूरी नसावी
तुमचे प्रेम नेहमीच आपली गरज असावी.
-------------------------------------------
आयुष्यात नेहमी स्मार्ट लोग येतील,
कूणी जास्ती तर कुणी कमी असतील..
निवड जरा विचारपूर्वक करशील..!
जरूरी नाही तुला माझ्यासारखेच मिळतील
-------------------------------------------
कोणा न कोणावर विश्वास ठेवावा लागतो
अनोळखी कोणी मग जवळचा बनून जातो।
नेहमीच गूणांच्या कसोटीवर नात जडेल असे नाही;
बरेचदा आपण अवगूणांवरही फ़िदा होत जातो।
--------------------------------------------
नजरेला नजर देऊन तर बघ
नवीन नातं जोडुन तर बघ;
मनाच्या इच्छा मारण्यात काय फ़यदा;
जरा तुझा शब्द टाकून तर बघ।
हे आकाशही सामावेल तुझ्या मिठीत;
जरा प्रेमाने हात पसरवून तर बघ।
-------------------------------------------------------
मैत्री बोलते .. प्रेम शांत राहते
मैत्री हसते .. प्रेम रडवत असते
मैत्री भेटते .. प्रेम विरहात जगते
तरी का लोग मैत्री सोडुन प्रेम करतात ?
-------------------------------------------
तु उद्दीष्टांच्या पूर्तीस नशिब समजतेस...
आणि मी तुला माझे नशिब समजतो...
खुप फ़रख आहे तुझ्या माझ्या नजरेत..
तु माला फ़क्त एक स्वप्न ;
आणि मी तुला माझं सर्वस्व समजतो ....
----------------------------------------------

मंदार हिंगणे