Friday, November 14, 2008

तशीच मैत्री कर माझ्याशी ..

मैलांचे अंतर मागे टाकून लाटा किनारागत पोहचतात;
काही क्षणच त्या किनार्‍यावर राहून जातात..
थोडी वाळु घेउन जातात थोडे पाणी थेउन जातात ;
भेट न पुन्हा कधी पण जन्माची ओढ ठेउन जातात

जगतांना असे बरेचसे अनुभव येतात.. बरेच वेळा अनोळखी व्यक्ति येतात आयुष्यात काही क्षणा करीता . कधी केवळ एक क्षणाची भेट पण खुप आनंद देउन जातात , आठवणी मागे ठेउन जातात.. कोण कुठली व्यक्ति त्या गोष्टी गौण असतात. त्यांच्याशी खर तर कुठलाच ह्रणानूबंध नसतो . पण कुठेतरी एक अनामीक ओढ असते मग ती भेटीची असो, नुसतेच बोलण्याची असो किंवा त्यांच्या सुखाची असो ... ती आपुलकी म्हणा ते जे काही असते ते मग काहीही असो .. त्यांच्या सुखासाठी आपल्या मनात एक संवेदना नक्कीच असते; कारण ते काळजाच्या वाटेने आयुष्यात आलेले असतात.
बरेच वेळा अश्या संवेदनांना नात्यात बांधणे हे त्या अनामीक नात्यासाठी धोक्याचे असते . त्यांना नात्यात बांधण्याच्या प्रयत्नात त्यातील संवेदना आपूलकी ओढ सगळ संपुन जाते.म्हणुनच ते जे काही आहे ते तसेच अनुभवावे .. कारण त्यातच त्याचा गोडवा टीकुन आहे.
म्हणून मी नेहमीच म्हणतो की ...


हजारो मैलांचा प्रवास करून येणार्‍या लाटांची
आणि किनार्‍याची भेट असते काही क्षणांची ...
तशीच मैत्री कर माझ्याशी ..
पण ओढ असु देत हजारो मैलांची ।

-----
Mandar Hingne

Thursday, November 6, 2008

तूझी वाट पाहणे...!

तूझी वाट पाहणे
ही वेगळीच बात आहे ...
तूझा विरहातही
तूझ्या आठवांची साथ आहे..

आठवण म्हणजे..;
सतत विचारात तूझ येण असत.
का
आठवण म्हणजे,
तू न मागताही तूला बरच काही देण असत

...आठवण म्हणजे;
तूझं मन आपोआप मला कळणं असत
की
एक नातं आपल्या मनाच
ऎकमेकांशी जूळणं असत

केव्हातरी मग
मन माझ होते अलवार
शब्दांकडे उघडते मग
माझ्या आठवांचे दार

मी मग होत जातो
एकटाच भरभरून व्यक्त
आणि समोरचे सारे विश्व
ऎकत असते माझ मन फ़क्त

अतातरी तुझ्या पावलांना
माझ्या दिलाचा रस्ता कळू देत
प्रेमाच्या नात्याने मग,
दोघांची ओंजळ अता भरू देत ..


--
मंदार हिंगणे