Saturday, June 20, 2009

दुर तरी माझी आठवण ठेव

कसे तुला सांगू एकांत तो कसा
त्या पानगळीला विचार विरह तो कसा।
उगाच फ़सवांचा आरोप का देतेस?
विचार तु काळालाही
तुझी आठवण न आली तो क्षण कसा!

आयुष्य अल्लड......म्हणून मी शांत आहे
असंख्य जखमांचे देणे....म्हणुन मी शांत आहे।
सांगावी म्हणतो जगाला कहाणी माझी;
येइल त्यात तुझे नाव..म्हणून मी शांत आहे।

शेवटी इतकचं म्हणेन की,

आठवांत राहीन ही ईच्छा ठेव;
नजरेपासून दूर पण मनात ठेव।
म्हणत नाही मी नेहमी साथ दे;
दुर तरी माझी आठवण ठेव

-
मंदार
29-04-09

Wednesday, June 17, 2009

ही रात्र चांदण्याची

नूरलो एकटा आताशा
माझा इतूकाही मी
मनास आज तूझसमीप
जेव्हा होतांना पाहीले मी

आनंदे सांगू कसे तूला
न गगनात मावलो मी
काळ्या तूझ्या डोळ्यात
जेव्हा मलाच पाहीले मी

उमगले भाव मनीचे
न सांगता तू मला ही
आरक्त तूझ्या गालावर
जेंव्हा खंळीस पाहीली मी

जादुई ह्या क्षणाची
किती वाट पाहीली मी
अवचीत रीते झाहलो,
जेव्हा मिठीत शिरलो मी

मनातल्या चकोरास
ओढ शुभ्र चांदण्याची
अशी एकदाच का येते
ही रात्र चांदण्याची

ही रात्र चांदण्याची

-
मंदार हिंगणे
१६-०६-०९

Friday, June 12, 2009

| हवीये तूझी साथ मला ।

खूप लांब आहे ही जिवनवाट
थोडी उसंत तूझपाशी हवीये मला
थोड दूरपर्यंतच का होइना
फ़क्त हवीये तूझी साथ मला ।

सारे आयूष्य नाही मागत
पण चार घटकाच मागतोय तूला;
त्या चार घटकांमधे जगण्यासाठी
हवीये तूझी साथ मला ।

धूंदीत आहे मी अन तू ही आहेस
मी तूझा नी तू माझी; हे क्षण दे मला;
अखेरचे एकदाच ह्या नशेत रमण्यासाठी
हवीये तूझी साथ मला ।

एका धूंद क्षणाची आहे भेट आपली
सोड उद्याची चिंता कशाला ?
फ़क्त अखेरचे ह्या वेळेत
हवीये तूझी साथ मला ।

अत्ता तर कूठे होतय कातरवेळ
चांदण्याही कूठे येत आहेत क्षितीजावर
फ़क्त शेवटचा चंद्र बघण्यात
हवीये तूझी साथ मला


--
मंदार हिंगणे
०४-०६-२००९.

Tuesday, June 9, 2009

मन वेड्यागत का होते?

.कसे सांगू की आज
मन वेड्यागत का होते?
जे म्हणावे आपलं
ते परकं का होते?

करी तू सहज इशारा
असा जाता जाता
ही तूझीच अदा,
मन माझे फ़िदा का होते ?

पहावे तूला एकटक
वाटे क्षण क्षण पहात राहावे
न दिसता तू क्वचीत,
मन बावरे का होते?

रंग सारे निसर्गाने
रूपात तूझ्या सजवीले होते
गंध, फ़ूले नी फ़ूलपाखरे
सांग तूझवरी रूसली का होते?

सजले दिवे तारंकांचे
उमळोन चंद्र ही आला
आसमंती मैफ़िलीत त्या
सूर तूलाच शोधत का होते?

चालतांना मी एकटाच
धूंद धूक्यातली वाट
मला नित्य वेढणारे
तूझेच भास का होते?

न शक्य अताशा
तूझवाचून जगणे माझे
अता डोळ्यात माझ्या
मिलनाचे स्वप्न का होते?

-
मंदार हिंगणे
०४-०६-०९