पीता पीता पीता... मी पीत गेलो
पीतां पीता ... मी क्षण क्षण झुरत गेलो
आठवता डॊळे नशीले मी शराब पीत गेलो
डोळ्यातल्या पाण्यात मी आकंठ डूंबत गेलो
प्याला ते अनेक प्याले मी रिजवीत गेलो
प्याल्यातल्या छबीला मी पुन्हा पुन्हा चूंबत गेलो ।
नशा तर मी करणार, त्यात नाव दारुचे खराब का
दारूची चूक ती काय? मीच चेहेरा "तीचा" बघत गेलो ।
पीणार मी इतका की दर्द सारे आता संपून जावेत
सोडुन ती गेली अन मी दारुस जवळ करत गेलो ।
बेवफ़ा सनम तुझ्यापरी ही दारू नशीली कैकवार बरी;
ह्रुदय जाळत होती.. तरी ओठांनी स्पर्शीत मी गेलो ।
प्याल्यावर प्याले मैफ़िलीत लोग संपवीत होती;
संपलेल्या प्यालात मी माझे रक्त भरत गेलो ।
परतीच्या वाटेवर शक्ती देहातली संपली नेमकी जेथे
तिथे कधी दिल्या घेतल्या वचनांची शपथ घेत "गेलो" ।
मंदार
१७-०७-२००८
Thursday, July 17, 2008
Subscribe to:
Comments (Atom)
