Thursday, March 11, 2010

खेळ खेळलो जरी हारलेला

.
मी आज मजलाच जाळुन आलो
तीच्या केसात गजरा माळुन आलो ।

आठवे पुन्हा पुन्हा तीच धुंद वेळ
मी व्यर्थ माझ्या मना चाळुन आलो ।

रंगल्या त्या क्षणांची भेट अनोखी,
गंध मोगर्‍याचे श्वासात ढाळुन आलो ।

चिंब भिजलेलो मी जादुई पावसाने
बरसणार्‍या चुंबनात ढगाळुन आलो ।

चांदण्याचा स्पर्श गं तुझ्या स्पंदनाचा,
मी मिठीत त्या मजला सोडुन आलो ।

मी हा खेळ खेळलो जरी हारलेला,
मी प्रेमरीत जगाची निभावुन आलो ।


-
मंदार (साद मनाची)
१०.०३.२०१०.

No comments: