Wednesday, February 17, 2010

आठवणींचा डोह

.
अरे ! हे असले सगळे
भास का होतायेत ....
मनाची आस घेऊन
हे भावनांचे वारे का धावतायेत .

कोण आहे तिकडे,
कोण आहे इकडे
कोणाचा आवाज हा,
कुठून येतोय साज हा

तो पहा... तो पहा पुन्हा आला
उजवीकडून आला
डावीकडूनही आला
वर आकाशातही घुमतोय...
अन हे माझे चरा-चरही स्पंदन करू लागलीयेत
त्याच तालावर

कोण छेडतोय हा मल्हार,
दोर तर कुठेच दिसत नाहीये
पण, कोण ओढताय मला अलवार......

आवाज तर,
विलक्षण जीवघेणा गोड
तरल..
सांजेला पसर्णाऱ्या लाली सारखा
कोण गातंय असे,
का जीव वेडावतोय?
अन डोळे कुणाला शोधातायेत पुन्हा पुन्हा?

आताशा....
काहीच कळेनासे झालाय
त्या चहूकडे घुमणार्या आवाजाचे
त्या तरल सुरांची आवाजाची गळा मिठी पडतेय
ते गात्रांना उमगत नाहीये...

अनुभवतोय ते फक्त अस,
ह्या विलक्षण जादूचा डोह असावा....
अन धैवाताच्या किनार्यावरून फक्त झोकून द्यावे स्वतास तस...
बुडबुडा नाही,
तरंग नाही एकाही,
आणि खळबळही नाहीच..
सरळ गाठावा तळ...

हो डोहच तो,
तुझ्या गाण्याचा,
तुझ्या आवाजाचा,
तुझ्या सुरांचा
अन, पुन्हा पुन्हा मला खेचणाऱ्या
आणि तुझ्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्या
तुझ्या "आठवणींचा डोह" ....

तुझ्या "आठवणींचा डोह" ....



-
मंदार
१६-०२-२०१०

Wednesday, February 10, 2010

तुझी आठवण ~~ 1 ~~ .

खोलीतील एकटा कि गर्दीतील एकटा
तर आम्ही बुवा गर्दीतले एकटे...
म्हणूनही कदाचित तुझी आठवण
नित नित सोबत करते मला

तशी तुझी आठवण येते
ह्यास काही काल वेळ नाही
जरा कुठे खुट्ट वाजल
तरी येते की तुझी आठवण

आठवांचा आवेग मात्र वेग वेगळा
जोर जास्त असलाच तर कविता होते..
नाही तर गालात हसून व डोळ्यात रडून आवेग ओसरून जातो

आत्ता तर तसा स्वताच्या असण्यात जगण्यापेक्षा
स्वताच्या नसण्यात जास्त जगतो मी त्याचा एकाचा फायदा असतो ...
तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी

तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी


-
मंदार
११-०१-2010