Tuesday, December 8, 2009

! फ़ुलराणी !

.
जी काल दिसली मला
फ़ुलराणी ती कुणी होती
नुर तीचा वेगळा नशीला
तीची नजर जादुई होती

कोण ती.. कुठली ती
मज प्रश्न असे नव्हते
एक अजीब होती सलगी
वाटे स्वप्न सामोरी होते

नाजुक ती ऎसी जैसे
फ़ुलपाखरु फ़ुलांवरले
देउनी रंग घेउनी गंध
तीने हे आसमंत धुंदवीले

आवरु कसा मी मला
मनावरी जोर नव्हाता
बांधु कसा मी इच्छेला;
ओढीस त्या दोर नव्हता

ती अशी रुप लेऊन आली
चांदणीचे रुप घेउन आली
गंधभारल्या तुझ्या श्वासांना
रातराणीही हुंगुन आली

जरा बावरलो जरा गोंधळलो
कोण देखणे कसे कळावे ?
फ़ुलराणी ही की परी देखणी
की संदर ह्या बागेतील फ़ुले

वेडे मन वेडे तन
शब्दही वेडावले अता
ये पुन्हा तू फ़ुलुन ये
हे जिवन तुजसाठी अता

शोधु कसे ती कुठे हरवली
सांगावा माझा देईल का कुणी?
नाजुक नवेली ती अलबेली
गेली मज वेड लावूनी......


--
मंदार (साद मनाची)
०८-१२-२००९

भ्रष्ट (वाळीत टाकलेला)

मी शांत
तरी प्रशांत
मुख हासरे
उरी आकांत

मला वेदना
भंगली अर्चना
थांबला दिन
संपली आलापना

वेसेवरी एका
थांबलो पुन्हा
प्रवेश ना मिळाला
काय माझा गुन्हा

भ्रष्टीत मला
केले सांगा कुणी
माणुसास आज
माणुसकीची उणे

टाकाऊ मी परी
नव्हे शिळे अन्न
माणसा परीस तरी
माणुसकीस आसन्न

गावतल्या मंदीरात
मिळे माणुसकीचे न्यान
संपताच पोथी - पुराण
सर्व सर्व कोरडे पाषाण

बाटलेला जरी
मला अभिमान आहे
खोट्या पावीत्र्याची
मला कीव आहे


--
मंदार (साद मनाची)
०७-१२-२००९

कवीत्व

ऎसे नाही की देशी ह्या कवी नाही जन्मला
नुसताच नाही कालीदास येथे घालीब होता जन्मला

महाकाव्ये ही ह्या देशी कमी ना झाली कधी
पानांवर पाने नुसतीच ना भरली कधी

तीच आहे हॊस आम्हा व्हावया शायर कुणी
आरती प्रभुही आज आहे आज आहे संदीप कुणी

न तंत्र न मंत्र शिकलो इतकेच बस लिखते रहो
समजले इतुकेच अंती लिखते रहो लिखते रहो

माणसापरीस साधाच कवीस जो ह्या समजला
मानु आम्ही त्यालाच आहे मर्म काही समजला

जन्मला जो जो येथे तो कवी आहे जन्मला
काव्यसर ह्या देशी अनादीकाळापासुन रंगला


--
मंदार

ती रात्र सोडवुन जा

रंगली आहे तुझ्यात
ती रात्र सोडवुन जा
केसात माळलेला तो
तु मोगरा उतरवून जा

आर्तता तनात छेडलेली
तु सार्थकी लाऊन जा
गंध तुझीया श्वासातले
तु ओठात भारून जा

स्पंदणार्‍या काळजाचे
तु तराणे छेडुन जा
ती प्रेमात रंगणारी
तु गझल गाऊन जा

ओढ डोळा दाटलेली
झणी बरसत होती
तुझ्या माझ्या प्रीतीत
तु आज भिजून जा


--
मंदार हिंगणे
०२-११-२००९.

रातराणी ..

.
सरत्या मैफ़िलीत कशी नादली गाणी
न कळे पुन्हा कशी गायली रातराणी

घेउन क्षण आठवांचे पाउल निघता निघेना
पकडुन हात घट्ट आज थांबली रातराणी

जडावल्या मनीचे गंध मिळाले श्वासांना
अखेर ओठांशी माझ्या स्पर्शीली रातराणी

सांगणार कसे, तीस शब्दांचीही साथ नाही
आवेगातच मजला बिलगली रातराणी

समजाऊ कसे तीला काही केल्या कळेना
अबोल संभ्रमात मलुल पडली रातराणी

शेवटची भेट ही मना हेलावुन गेली
बहरलेल्या ह्रुतुतही ही सुकली रातराणी

दु:ख नसे कुणा की, स्वप्न मिलनाचे अधुरे
पाहुनी अश्रु माझे ती पहा रडली रातराणी



---
मंदार हिंगणे
(साद मनाची)
२८-१०-२००९

आणि जिवन जिंकत गेले

कोण बघतय कुणाची वाट ?
झाडाने बघीतली
फ़ळा फ़ुलांची वाट ?
फ़ळांनी चिमुकल्या रोपांची वाट?
अन जमीनीच्या गर्भातुन त्यांनी अंकुरण्याची वाट?
अश्या प्रत्येक वेळीस "जिवन" जिंकत आले ..

प्रेमास मिळाली सावली
प्रीयेच्या मस्ती भारल्या तारूण्यात.
तीच्या काळ्याभोर डोळ्यात ..
एका तान्हुल्याचे निष्पाप स्मित मिळाले..
आणि पुन्हा एकवार "जिवन" जिंकले..

उगवत्या सुर्याच्या पुन्हा मावळण्यात
चंद्राच्या चंचल विहरण्यात
रात्रीच्या अलवार तरंगात
आणि प्रात:काळच्या भुपालीच्या स्पंदनात
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकले .

साधकाच्या विशुध्द साधनेत
तापसाच्या कठीण तपश्चरेत
मॊनीच्या अबोल अवस्थेत
नि:सीम भक्तिच्या शब्दातीत भक्तिमधे
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकत गेले


---
मंदार

तुझ्यात मी

.

तीच मी
तुझ्यातली |
गंध भारल्या
श्वासतली |

मिट डोळे
पावशी मला |
उघडता डोळे
स्वप्नातली |

येथे तेथे
शोधीसी उगा |
मी तुझ्या सवे
सावलीतली |

तुझीच मी
संपली जरी |
उरेन मी
भासातली |

बघ वेड्या
ह्रुदयांतरी |
मी प्रवाह
रक्तातली |



--
मंदार(साद मनाची)
०९-१०-२००९.

महाभारत..कथा नाही सत्य आजचे

महाभारत
ही कथा नाही
एक आपलेच आणि
त्या हरएक युगाचे सत्य आहे
जेथे
बुरसटलेल्या सांस्क्रुतीक बेड्या,
डळमळलेला आशावाद,
मुल्यहिनता आणि भ्रष्ट समाजवाद
जिवनाचे मापदंड ठरतात..

जेव्हा ,
न्यायासाठी बंद असता ध्रितराष्र्टा चे डोळे
आणि जैसे ठेवली अनंते तैसेची राहाणे हा धर्म
जेथे,
आचार्य द्रोणाचार्‍यांचे कर्तव्य
पोट भरविण्यासाठी कोणापुढेही नतमस्तक होते

येथे तयार होते पार्श्वभुमी "महाभारताची"

जेथे
दुर्योधन आणि दु:शासन
हे खरे खलनायक नाहीच मुळी
ते तर फ़क्त बाहुले शकुनीच्या हातातले

जेथे,
कर्ण आणि एकलव्य
बळी ठरतात
एकाच व्यव्यस्थेचे
की जी गांधारी प्रमाणे
आपल्याच डोळ्यांनवर पट्टी बांधते

स्वताच्या अपमानाने डिचवलेली द्रौपदी
विसरून जाते की,
दुसर्‍यांच्या जाती आणि विकलांगतेवर
व्यंग करतांना
स्वत:च्याच संस्काराच्या उणीवा दिसतात..

आजही द्रौपदीला डावावर लावणारे
षंढ आजही समाजात वावरतात.

तर,
महाभारत
जी फ़क्त कथा नाही
सत्य आहे
कदाचीत
आपल्या ह्याच काळातले..नाही का?


--
मंदार