Tuesday, October 28, 2008

मज आठवीते तू माऊली

दिवाळीचा सण थोर
सजवीतो घर दार
मांडतो दारापूढे
तेलदिव्यांच्या रांगोळी
पाहून दिव्यांची आवली
मज आठवीते तू माऊली ।


आठवीता दिवाळी
मनी दाटते तूझे रूप
चैतन्याने ओतप्रोत
तूझा घरातील वावर
उजेडात पणतीच्या
तूझी तेजाळते सावली
मज आठवीते तू माऊली ।

जरी आज दूर पोटासाठी
जाउ दिलेस तु मला
माहीत मला अन तूलाही
आहे ते माझ्याच भल्यासाठी
झाली चार वर्षे पाहुनी तूला
जिव होतोय ग वरखाली
मज आठवीते तू माऊली ।

आज सुख लोळती पायापशी
तरी जीव मायेचा उपाशी
तुज भेटाया झुरतो मी
का न ठेवले तू मला
ग आई तूझ्या पदराखाली
मज आठवीते तू माऊली ।

No comments: