Wednesday, July 1, 2009

: ओढणी :

.
एक सूंदर ओढ्णी

तीच्या अंगावर बूट्टेदार लडी
काय सांगू दोस्ता
तीव्या रंगा ढंगाची गोडी

तीचे सोनेरी काठ
मला छळण्याचा घाट
हळू हळू वार्यावरी उडे
जीव माझा धडधड करे

तीच्या अंगावरची रेघ
वाटे पावसाळी मेघ
खट्याळ तीरपा कटाक्ष
कशी ओळखावी मेख?

डोईवर तीच्या येता अशी
भासे चंद्राची आभा जशी
गोंडा तीचा मस्तीत झूले
वाटे मज काहीतरी बोले

तलमता स्पर्शात अशी
नाजूक सोनकळी जशी
घेताच चांदणीचे रूप
फ़िक्या मोत्यांच्या राशी

अता तर खुप झाली वेळ
आणि ओढणी करतेय खेळ
जीव होतोय ग वरखाली
जाणे कधी होईल ग मेळ

--
मंदार
01-07-09

No comments: