Tuesday, March 4, 2008

तीला मी बघीतले जितुके - विडंबन

संदीप खरे ह्यांची माफ़ि मागुन मी त्यांच्या गझलेचे विडंबन करततोय असे
काही चुकले असल्यास मला सग्ळ्यानी समजुन घ्यावे हीच विनंती ...
मुळ गझल : -


तीला मी बघीतले जितुके; तीतके कुणी बघीतले नाही..
तीला बघेणे आता जरुरी राहीले नाही

तयानी मोजलीच माझीच पापे न्य़ान देता
तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासात
तिचेहे वागणे माझे तिलाही झेपले नाही

कसा सुचतो तीला श्रुंगार हे मला समजले नाही
कसे सुचले मला गाणे तीलाही उमगले नाही

कसा वाख्या तयाना समजऊ मी धुंद डोळ्याच्या
तिला प्रत्यक्ष तयानी एकदाही पाहीले नाही

तिच्यासाठी निघाले प्राण सरले भान जगण्याचे
तिचे काही स्वत:चे एकदाही बिघडले नाही

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटउन सारी
असा झालो फ़रारी मी मज पुन्हा पाहीले नाही
-----------------------------------------------------------------------------------


विडंबन :-
एखाद्याला कविता आवडत नसतील आणि नेमके त्याची प्रेयसी जर कवयत्री असली तर काय ....... ????
त्याच्या मनस्थितीचे वर्णन करण्याचा हा एक प्रयत्न ... कोणासही दुखविण्याचा हेतु नाही.. केवळ एक गमतीचा भाग म्हणून घ्यावा ही विनंती ...
----------

तीला मी ऎकले जितुके कुणीही ऎकले नाही..
तीला ऎकणे आता मला सहन होतही नाही ॥१॥

तीनीच ऎकविली तीचीच कड्वे जणु श्राप देता
आठओळींच्या चारोळीला कुणीही (आजवर) देखीले नाही ॥२॥


तीने लावला सुर तेव्हा भरल कापरं अंगात
तीचे मुक्तछंद काही मला झेपले नाही ॥३॥


कसा सुचते तिला काव्य हे मला समजले नाही
कसे आठवले काम (नेमके) हे तिलाही उमगले नाही ॥४॥


कसे ओळखु मी मात्रा त्या विपरीत काव्याच्या
अलंकारांची बाराखडी मी कधीही गिरवीली नाही ॥५॥


काव्यात तीच्या अडकलो; उडाले केस माथ्याचे
तीचे गायने गझल काव्यांचे कधीही थांबले नाही ॥६॥


मनाचा निश्चय करुनी मागे ठेवली ती कविता ती शायरी
सटकलो तेथुनी अचानक असा आजवर कुणीही पळाले नाही ॥७॥


------
मंदार हिंगणे
२१ / ११ / २००७.

No comments: