Saturday, April 19, 2008

उद्या जर ... !

कधी कधी रात्री जागून मी
तीला गाढ झोपलेलं बघतो .....
शांत स्वप्नात हरवलेल्या तीच्या
चेहे‍र्‍यावरच्या मूकरी हास्यात... मी हरवतो...
कटाक्ष टाकून मी पून्हा लवंडतो ..
आणि एक विचार नेहमीसारखा
माझ्या मनात रूंजी घालू लगतो ....
"जर मी उद्या उठलोच नाही ..
.... तर कळेल तीला कधी
मी तीच्याबद्दल काय विचार करतो ..??"

.
जर माझा "उद्या" आलाच नाही... !
तीला कधी उमगेल का माझे प्रेम ??
की ती जीव माझा....माझे सर्वस्व आहे ...
मी पूरेसा यत्न केलाय का तीला भासवीण्याचा..???
करतोय किती प्रेम हे सांगण्याचा ???

.
आणि जर येथली संपली असेल माझी वेळ ..
..... तीला जगावेच लागेल माझ्यावीना ;
जर माझा "उद्या" आलाच नाही... !
जगेल का ती माझ्या प्रेमाच्या आधारे ....??
.

म्हणुन मी अता मनाशी ठरवलय ...
प्रत्येक दिवशी..प्रत्येक वेळी ..
मला तीला सांगायच ..
तीचे माझ्या आयुष्यातल स्थान .., माझ प्रेम
तीला सगळ सगळ सांगायचं ....
न जाणो "उद्या" परत सांगता येईन की नाही...?

----
मंदार हिंगणे
१६-०४-२००८

No comments: