नसतेस घरी तू जेव्हा ... ह्या संदीप खरे ह्यांच्या नितांत सुंदर गाण्याचे.. मी विडंबन केले आहे.. तेव्हा प्रथम त्यांची माफ़ी मागतो .
आज सकाळीच त्या गाण्याची लिखीत प्रत माझ्या ईमेल वर आली.. ती वाचतांना जे सुचत गेले ते लीहीत गेलो. कूणास दुखवीण्याचा हेतू नाही.. एक आनंद म्हणून बघावे ही सगळ्याना विनंती ....
क्षमस्व..
-----------------------------------
मुळ काव्य:
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तूटका तूटका होतो
जगण्याची विरती धागे
संसार फ़ाटका होतो..
नभ फ़ाटून वीज पडावी
कल्लोळ तस ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो
येतात उन्हे दाराशी
हिरमुसूनी जाती मागे
खिडकीशी धबकून वारा
तव गंधावाचून जातो
तव मिठीत विरघळणार्या
मज स्मरती लाघव वेळा
श्वासावीन ह्रुदय अडावे
मी तसाच अगतीक होतो
तु सांग सखे मज काय
मी सांगू ह्या घरदारा
समईचा जीव उदास
माझ्यासह मिण मिण मिटतो
न अजूनी झालो मोठा
न स्वतंत्र अजूनी झालो
तुजवाचुन उमगत जाते
तुजवाचुन जन्मच अडतो
----------------------------------------
असतेस घरी तू जेव्हा
जीव धडका धडका भरतो
हिमतीचे विरती धागे
जीव बार फ़ुसका होतो ...
वस्तू लागून काच फ़ूटावी
आवाज रोजचाच येतो
ही भांडी दिशाहीन होता
अन पती मारका होतो
येतात पाहूणे दाराशी
हिरमूसूनी जाती मागे
खिडकीशी गाव तो सारा
तव गूण पसरवत जातो
तव मूठीने मिळणार्या
मज खुपती जाचक खूणा
मुख दाबून बुक्के पडावे
मी तसाच स्तंभीत होतो
ते सांग देवा मज काय
मी सांगू ह्या जगताला
एकला मी न उदास
हरएक रोज रोज पीटतो
न थांबला तो तंटा
न मी चीत अजूनी झालो
तीलाच आवरत जातो
दिनरात कसेसे लोटतो
--
मंदार हिंगणे
२१/०५/२००८
Wednesday, May 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
फ्लो उत्तम जमलाय.
शब्दही अचूक. काही शब्द मूळ गाण्याच्या वृत्तानुसार नसल्याने खटकले पण एकूणात छान आहे.
अमित
Post a Comment