Friday, October 24, 2008

!...... चातकाची हाक.......!

आले आले घन-मेघ हे दाटून
पुन्हा आला श्रावण एकदा फ़िरून

भिजवीली माती दरवळे सुगंध
नाचती पाखरं एकरूप होवून

गरजला नभातूनी हा नाचला रानभर
सैदामीनी गाई गाणे नभास बिलगून

टपोर्‍या थेंबानी शहारले अंग अंग
सरीत पावसाच्या हरपले भान

तापल्या धरेवर गारव्याची पखरण
थबकल्या मनावर आशेचे किरण

बरसणार्‍या क्षणात उभा हात पसरून

येना सये अता ते पाश दुर सारून

नसे मल्हार जरी कमी न मझी साद
झणी ये धावत ही चातकाची हाक।

--
मंदार हिंगणे
२३/१०/२००८

1 comment:

Mandar Joglekar said...

Namaskar,

Please do post your blogs on www.MyVishwa.com too. That way larger audience will get benefited.

Thank you
..Mandar M. Joglekar
President & CEO MyVishwa
MyVishwa - "We Create Time"
http://www.MyVishwa.com