Thursday, July 9, 2009

ग सये मनचली...

ग सये मनचली
तू गुलाबाची कळी
चोरूनी मन माझे
तू का दूर उभी

ग सये मनचली ....

गालावरची खंळी
मज काय बोली
सांग सये अता
लाजू नको मूली

ग सये मनचली ....

ओढणी तूझी ही
अस्से खेळ करी
वार्‍यावरी झूलतां
गं शततारा जाळी

ग सये मनचली ....

मस्तीत ही रात
किती जादूई बात
उमळला चंद्र आकाशी
एक चंद्र माझ्यापाशी

ग सये मनचली....

तू परी चांदण्याची
की माझ्या स्वपनांची
चोरूनी मन माझे
तू दूर का उभी

ग सये मनचली....

झूरून झूरून अशी
का निघून जाशी?
तू भाव अंतरीचे
आण तूझ्या ओठी

ग सये मनचली....

तूला बिलगे पाऊसही
का आग माझी व्हावी
सये दे जरा मिठी
सांधू जन्माच्या गाठी

ग सये मनचली....


--
मंदार हिंगणे
०६-०७-०९

No comments: