Sunday, March 21, 2010

तव गझला उमलता गुलाब होता |

तव गझला उमलता गुलाब होता
शब्द तयातला फ़ुलता शबाब होता ।

अनोळखी तु तरी कशी ओळ्खीची?
अडलेल्या प्रश्नांचा हा जवाब होता ।

गगनात होतो जळता चांद मी एकला
तव गझलेचा मिळाला आफ़ताब होता ।

कळे न कसली ओढ होती मनाला;
हासरा-लाजरा असा कातील नकाब होता ।

न शायर मी, तरी कशी केली शायरी;
आज तार्‍यापरी जळाला महाताब होता ।


--
मंदार (साद मनाची)
२०-०३-२०१०.

Thursday, March 11, 2010

खेळ खेळलो जरी हारलेला

.
मी आज मजलाच जाळुन आलो
तीच्या केसात गजरा माळुन आलो ।

आठवे पुन्हा पुन्हा तीच धुंद वेळ
मी व्यर्थ माझ्या मना चाळुन आलो ।

रंगल्या त्या क्षणांची भेट अनोखी,
गंध मोगर्‍याचे श्वासात ढाळुन आलो ।

चिंब भिजलेलो मी जादुई पावसाने
बरसणार्‍या चुंबनात ढगाळुन आलो ।

चांदण्याचा स्पर्श गं तुझ्या स्पंदनाचा,
मी मिठीत त्या मजला सोडुन आलो ।

मी हा खेळ खेळलो जरी हारलेला,
मी प्रेमरीत जगाची निभावुन आलो ।


-
मंदार (साद मनाची)
१०.०३.२०१०.

आजचा चंद्र...

.
अंधारु आले आकाश..
संधीप्रकाश..

बोचरा वार
एकला रान सारा ..

दिवेलागणीची वेळ
सुरु होतो खेळ.

एक चांदणी ..
दुसरी चांदणी ...

उमलते नक्षत्र ..
चढु लागते रात्र ..

चांदही उगवला ..
सुवासही जरा सावरला ..

आजचा ,
तो चंद्र तुझ्यासारखा..
गोरा पान ..
शीतल..
गुदगुल्या करणारा
गालात हसणारा ..

अगदी तुझ्यासारखा..
तेच योवन त्याचे
तीच गर्विष्ठता..

आणि

तीच दुरी ठेवणारा ...





--
मंदार
१०-०२-२०१०

शुद्ध पाण्याने भरलेल्या प्याल्या

.
रात्री औफ़िसमधुन घरी आल्यावर
बायकोला सांगतो ..
अग एक "ग्लास" तर आणं..

फ़ोडणीच्या तडतडीत..
आणि भाजीच्या चुरचुरीत तीचा आवाज येतो..
आलेचं हं बसा तुम्हि ..

आणि मग ग्लास घेउन ती येते
स्वयंपाक घरातुन..
लटकत मटकत.. घेउन जराशी गीरकी ..
सोबत येतो मोगर्‍याचा गंध
तीच्या केसातील वेणीचा ..

मग ती टेप वर गाण लावते
"दिल चीज क्या हैं आप मेरी जान लिजीये"
आणि त्या गाण्याच्या ओळीवर
स्वत: गुणगुणत मला "ग्लास" देते ..

अता दिलाच आहेस ग्लास ...
तर मग ओत ह्यात
तुझ्या धुंद साथीचे ..
तुझ्या धुंद सुवासाचे..
काही हळवे नशीले क्षण...
आणि पाज मला तेच नशीले रसायन
तुझ्याच धुंद हाताने ..

ती हसत हसत मग त्यात "शुद्ध पाणी" भरते

येते एक वेगळीच
त्या "शुद्ध पाण्याने भरलेल्या प्याल्याचीही" नशा ..
मयखान्यातल्या प्रत्येक मद्यांना मागे टाकेल अशी



-
mandar (Sad Manachi)
08-03-2010.

Friday, March 5, 2010

नजर

नजरेची नजरेला ही साद आहे
सये तुझ्या डोळ्यात मी कैद आहे |

तुझ्या डोळ्यांचा मज एका सहारा
नको बरासावू धारा मी वाहत आहे |

घ्यावे तुला मिठीत मला प्रश्न आहे
लाजल्या डोळ्यांचा काय जबाब आहे |

तुझी माझे प्रीत डोळ्यातून बोलकी
मुके मुके राहुनी तू गात आहे |

कसली धुंदी तुझ्या डोळ्यात आहे
कसले नाते नवीन तू गुंफत आहे |

-
मंदार
21-11-09

मी तुला पहात होतो

अंगणी प्रेमाचे सप्तसुर गातांना
झाडावरूनी अबोली तोडतांना
चोळी थोडी तटतटुनी येतांना
सये, लपुन मी तुला पहात होतो

मन धावले धुंद
विचार झाहले संथ
स्वर ते हळवे अंगणात पसरतांना
सये, मी गाणे ते ऎकत होतो

वर्ण ते साजीरे
सुंदर ते नाहलेले
सांजवेळी चमकतांना
सये, माडीवरुन मी तुला पहात होतो

हळुच अंगणी यावे
तुला मिठित घ्यावे
परी पाहुनी तुला लाजतांना
सये, पुन्हा मी दारात थांबत होतो


-
मंदार
(साद मनाची)

Shri Vi. Da. Savarkaranchya "Tanuvel" hya kavitevarun kahi suchale te lihile. Asha karto aapanas aawadel.

तुझ्या कारणे

.
आठवाना आठवावे असे नसते
तरी आठवून "आठवण" आठवतो
आठवात सवय जडली इतुकी,
न कळे असा मी कितीक आठवतो

आठवून आठवून आठवणार किती
मनाला का कधी असतात भिंती
स्वैर स्वैर वागणे आठवांचे
मारून मुटकून कोंडणार किती

न आठवणे कधी असे चांगले
न जमे मजला ते तसे वागणे
हताश मी पुरता अश्या आठवाना
तुला न ठावे, हे सारे तुझ्या कारणे



-
मंदार
२४-०२-२०१०

सार्थकता (Vinodi Kavita)

मोहोल्यात तुझिया येणे, न कधी सोडले मी
"नाही" म्हणालीस तरीही, पुसणे न कधी सोडले मी |

न एकटा मी, झाले लाख घायाळ येथे;
तुझ्या नजरेशी नजर देणे, न कधी टाळले मी |

किती कडक पहारा, भावांचा तुझ्यावरी हा
त्यांनी अनेकांना अनेकदा बुकलाताना पहिले मी |

मार खाण्यातही एकाला मी काही नव्हतो
मार खाउनी अनेकदा, फक्त वसा न कधी तोडला मी |

सार्थकता ह्या तपाची कधी अशीही व्हायची होती;
काय म्हणतेय ती पहा येथे, जे न कधी ताडले मी |

रे माकडा जा, जरा पहा चेहेरा आरशात खरा
पदवीस त्या ही, हृदयाशी कवटाळणे न विसरलो मी |

कळवळलो जरासा, अन निघालो माघारी
जातानाही अनेकदा वळून वळून तिला पहिले मी |

हे व्हावे असे, देवासही बहुदा मंजूर नव्हते काही;
पहा आली माकडीण मागे, अन पुढे पुढे चाललो मी |


--
मंदार
२३-०२-२०१०

आता सोडले मी

मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |


मंदार
२३-०२-२०१०