Friday, March 5, 2010

सार्थकता (Vinodi Kavita)

मोहोल्यात तुझिया येणे, न कधी सोडले मी
"नाही" म्हणालीस तरीही, पुसणे न कधी सोडले मी |

न एकटा मी, झाले लाख घायाळ येथे;
तुझ्या नजरेशी नजर देणे, न कधी टाळले मी |

किती कडक पहारा, भावांचा तुझ्यावरी हा
त्यांनी अनेकांना अनेकदा बुकलाताना पहिले मी |

मार खाण्यातही एकाला मी काही नव्हतो
मार खाउनी अनेकदा, फक्त वसा न कधी तोडला मी |

सार्थकता ह्या तपाची कधी अशीही व्हायची होती;
काय म्हणतेय ती पहा येथे, जे न कधी ताडले मी |

रे माकडा जा, जरा पहा चेहेरा आरशात खरा
पदवीस त्या ही, हृदयाशी कवटाळणे न विसरलो मी |

कळवळलो जरासा, अन निघालो माघारी
जातानाही अनेकदा वळून वळून तिला पहिले मी |

हे व्हावे असे, देवासही बहुदा मंजूर नव्हते काही;
पहा आली माकडीण मागे, अन पुढे पुढे चाललो मी |


--
मंदार
२३-०२-२०१०

No comments: