Saturday, April 10, 2010

!! जरासा !!

रात्र मंद धुंद होती,
वारा बोचरा होता जरासा
नेहमीचा प्याला होता,
जामही होता जरासा।

लालेलाल जळजळता
प्यालातला जाम जरासा,
जोडीला तुझ्या आठवांचा,
फ़ेसाळता बर्फ़ जरासा।

एक आठवण एक प्याला,
खेळ रंगला जरासा,
मी तर मी, सवे माझ्या
जामही धुंदला जरासा।

विरघळे हलकेच रात,
अन नशा तुझ्या आठवांची,
हरएक जाम देत होता
गंध तुझा जरा जरासा।

पहाट हसते एकलीच,
उरही भरला जरासा,
मी मानली हार जेव्हा
जामही सांडला जरासा।


-
मंदार (साद मनाची)
०६-०४-२०१०

No comments: