Tuesday, February 12, 2008

गझल ती माझी प्रेमात रंगत होती !!






तराणे ह्रुदयाची धडकनेच गात होती
गझल ती माझी प्रेमात रंगत होती


ल्यायली ना सुर ना साज मैफ़िलीत होती
आलापली प्रीत ती म्युक्यानेच होती


नुमगली कधी भाषणे तीच्या डोळ्यातली
जिंकतांना आज डाव का मज देत होती?

भातुकली नव्हे ती ओढ आपल्या मनाची
तोडुनी बंध नदी आज सागरासमीप होती


डोळात थांबलेली आर्तता काळजातली
तरी करीत का बहाणे गझलेची होती?


क्षणी बरसली ओढ ती डोळा दाटलेली
भिजऊत जी गेली ती आपूली प्रीत होती

----
१२/०२/२००८

तिच्यासाठी !!

तिच्यासाठी मी तळपणारा सुर्य होइन,
तिच्यासाठी मी आयुष्यभर जळीन ।

तिच्यासाठी मी चंद्र नभीचा होइन,
चांदण्याच्या मैफ़िलीसंगे प्रेमगीत मी गाइन ।

तिच्यासाठी देवघरातला दिवा मी होइन,
कितीही मिणमिणलो तरीही तीलाच प्रकाश देइन ।

तिच्यासाठी तीची सावली मी होइन,
तीने नाही ओळखले तरीही, सोबत तीच्या राहीन ।

तिच्यासाठी खळखळणारा झरा मी होइन,
तीच्या साठी सागरासही जाउन भिडेल ।

तीच्या साठी करता येइल तीतके करुन मी घेइन,
तीच्या साठी मरता आले तर जीव माझा देइन ।

तिच्यासाठी मेलो तरी बेहेत्तर,
तिच्यासाठी मातीतुन पुन्हा मी उगविन ।

-------
17/09/2007, Cameroon

Monday, February 11, 2008

Ashi प्रेयसी असावी !!



प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी


चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठुन दिसणारी असावी


गालीबची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी


यश-राज पिक्चरची हिरोईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फ़ुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण आंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी


हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी


ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्याना हळुवार जपणारी असावी


ओळख असुन सुध्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी


केव्हातरी कुठेतरी ती भरभरुन व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपीत मग डोळ्यानीच सांगणारी असावी


थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फ़ुगण्यात मज्जा असावी


हसतांना गोबर्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पडन्याची मग माझी रीतच व्हावी



ईवल्याश्या नाकावर राग घेउन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मीठीत रडणारी असावी


चोरुन चोरुन भेटायला येणारी असावी
हातात हात घालुन मग सगळ्यांसमोर फ़िरणारी असावी



तीच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुखात सदा दोघांची साथ असावी


जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फ़ुलवणारी असावी



आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांन्च्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी


प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी



तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरुप होऊन जळतांना इतरांना प्रकाश देणारी असावी

------
०४ / ११ / २००७.

लव्ह आट फ़र्स्ट साईट !!

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं बरच ब्राईट असत
आपलं सोल-मेट शोधण्याचं नेट आणि थेट तंत्र असत
सापडलं तर ठिक नाहीतर थोड वेट करायचं असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं फ़ास्ट असत
इतर कुथल्याही प्रकारापेक्षा जास्त इफ़ेक्टीव्ह असत
स्वप्नांच्या गावी झटकन पोहचवणारं ते जेट असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं ग्रेट असत
जैसी उर्मिला वैसा फ़ॊर्मुलाच कधी ते सेट असत
पहीले वहीलं असलं तरी ते एव्हर-लास्ट असतं

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं स्ट्रेंज असत
कळत नकळत कधीही कसेही कुठेही ते घडत असत
सरळ साध्या आयुष्यात उलथा-पालथ घडवत असत

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं पाऊसाची सर असत
सर पडुन गेल्यावरही पागोळ्यागंत उरुन राहण असत
चैतन्याचे इद्रधनुने आकाशातुन धरणीवर उतरण असतं

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं बरच काही असत
कधी सगळ सांगणार तर कधी सगळ लपविणार असत
ओठात अडले तरी डोळ्यांतुन निथळणारं ते गुपीत असत.

लव्ह आट फ़र्स्ट साईट हे तसं प्रेमच असत
कधी फ़सत तर कधी उमलत असत
पुष्कळदा अनामिक नात्याचं जोडलेल ते बंधन असत

बरेचदा जवळच्या नात्यानाही प्रेम माहीत नसतं
असल्या जळपट नात्यांच्या तुलनेत ते खरच छान असत
निदान ज्याच्यावर जडत त्याच्या सुखासाठी तळमळत असत
कारण शेवटी ते प्रेमच असत, जरी ते लव्ह आट फ़र्स्ट साईट असतं

----
६ / ११ / २००७.

Saturday, February 9, 2008

तु म्हणजे एक स्वप्न !!


तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........ ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही,
........... डोळ्यातुन ओघळणारे ।
तु म्हणजे एक स्वप्न...,
नसानसात भिनलेले,
श्वासासारर्ख जवळचे,
तरिही दुर दुर असणारे... ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मिटताच डोळे तूला बघणारे,
.... अन उघडताच तुलाच शोधणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही,
........ असल्याचे भासविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही,
...........पुन्हा सर्व पसरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही न झालेले,
तु दुर असलीस तरीही,
....... तुझ्या सुखासाठी तळमळणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन,
...... कितेकदा स्वत:लाच हरविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही,
........ पालवीची आस धरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
दिलाच्या भावानांनी सजलेले
.... अन फ़क्त कागदावरच राहणारे।

--
मंदार हिंगणे
Cameroon, २१ / ०४ / २००७

Friday, February 8, 2008

"आनंदाच झाड" !

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे

उन पाउस झेलतं
साद नभाला घालतं
पानगळ सोसुनही,
पुन्हा बहरुन येतं

पाखरांचा सुर त्याच्या मोहरात आहे
चैतन्याच गीत त्याच्या काळजात आहे

आनंदाच झाड माझ्या अंगणात आहे
खोल रुजलेले माझ्या जिवनात आहे



तुम्हाला माहीतीय "आनंदाच झाड" कसं उगवत ?

"कल्पनेची एक बी घ्यायची....
तीला मायेच्या जमीनीत पेरायचं....
तीला कॊतुकाचं खतं घालायचं...
आणि नित्यनीयमानं प्रेमाच्या झारीतुन पाणी घालायचं त्याच्या मुळाशी..."


खरतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाशिवाय त्याला जगताच येत नाही. तो स्वभावच त्याची शक्ती असते.., तोच त्याला आनंदाप्रत पोहचवत असते..सांभाळुन ठेवत असते..

आनंदाची पाठराखण करणारे अशी कितीतरी माणसं दिसतील. भगतसिंग..मदनलाल धिंग्रा.., सावरकर, असे एक ना अनेक उदाहरण देता येतील. "स्वातंत्र्य" हाच एकच त्यांचा स्वभाव..तोच स्वभाव त्यांना आनंदाप्रत घेउन गेला. त्याच आनंदाच्या सामर्थ्याने त्याना प्रतीकुल परीस्थितीतुन तरुन नेले..

कष्टांची तमा त्याना नाही.. पण आनंदाने काट्यानाही गोंजारणारी.... भयंकर वास्तवातही मग आपली स्वप्नांची दुनीया बसवीणारी... कोणी कितीही त्यांच्या स्वप्नांवर अविश्वास दाखवला तरीही त्याच अविश्वासाच्या घाट्ग्यावर विश्वास ठेऊन स्वप्न बघणारी.

भग्न स्वप्नाच्या तुकड्याना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी बांधुन ठेवता येत नाही ! त्याला भविष्याच्या गरूड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पाहणं, ते फ़ुलवणं, ते सत्यात उतराव म्हणून धडपडण, त्या धडपडीतला आनंद लुट्णं .. आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावल तरी त्याच तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुस~या स्वप्ना माने धावणं हाच मानवी स्वभावधर्म आहे. मनुष्य जिवनाला अर्थ येतो तो त्यामुळं !

खर सांगायच तर... "आनंद" ही एक स्थीती आहे.. की ज्याप्रत माणसाने पोहचण्याची धडपड केली पाहीजे.. ऊन-सावली... सुख.- दुख... रडणे-हसणे...दैव-प्रारब्ध-कर्म हे सगळे क्षणीक बघा..क्षणा क्षणाला सरड्यासारखे रंग बदलणारे. आनंदाने त्यांच्यावरही मात करता येते.

आनंद असावा त्या "बी " सारखा... जमीनीत खोल काळोखातुन अंकुरुन सुर्याकडे झेपावणारा
आनंद असावा त्या "झाडा" सारखा... वणव्यात पोळुन सुद्धा पुन्हा पालवीची आस धरणारा
आनंद असावा त्या "लवचीक वेली" सारखा... कुठल्याही स्थितीतुन तरुन जाणारा..
आनंद स्वस्त आहे... कारण त्यासाठी पैसा मोजावा लागत नाही
आनंद कालातीत आहे.. कारण तो कुठल्याही काळात मिळू शकतो.
आनंद अक्षय आहे.. कारण कितीही वाटला तरी संपूच शकत नाही
आनंद ध्रूवा सारखा अढळ आहे.. एकदा सापडला की कोणीच हिराउ शकत नाही...


आपणा सर्वांनाही हा अमुल्य आनंद मिळो हीच श्रीचरणी प्राथना ।

--------------------------------------------
[वरील लेख मी.. श.ना.नवरे लिखीत "आनंदाच झाड" ह्या त्यांच्या पुस्तकावर आधारीत चित्रपटावरुन लीहीले आहे. त्यावर "आनंदा" विषयी मला जे वाटल ते मी शब्दात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आपणासही आवडेल.]

धन्यवाद.
मंदार

मी माझा !!!

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता. न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?" त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला" .

माझे ही असेच आहे काहीतरी , जगा आणि जगु द्या यावर माझा विश्र्वास आहे. खर तर माणसाने झाडासारखे असावं; झाड कधिच सुखासुखी वठत नाही, ते नेहमीच ओलावा शोधत राहतं; तेच खरं खरं प्रेम करत जिवनावर. मग ते जिवन कितीही विरुप कितीही वेडेवाकडे वा कितीही विद्रूप असु द्यात. म्हणुनच म्हणतो - माणसानं झाडासारख वागावं, कारण मृत्युनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते.

जी माणसे हवीशी वाटतात ती कधी भेटत नाही आणि जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याकडे जावेशे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही आणि ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावेच लागते. जेंव्हा जीवन नकोसे वाटते तेंव्हा काळ संपत नाही, जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो पण तेंव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असच असते त्याच्याशी जरा जपून वागाव लागतं तिथे कोणाचेच चालत नाही जिकडे नेईल तिकडे जावेच लागत. अशावेळेस फुले आपल्याला बरेच काही शिकवतात......,

गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं.

मी खरतर खुप खुप बोलायचे ठरवतो, माझ्या भावनांना शब्दात बसवायचं ठरवतो, चार ओळी जोडुन कवीता करायची ठरवतो; पण शब्द अबोल होतात,मन मात्र बोलयला लागत मग आठवणीशी भांडण होतं. कधीतरी नंतर मग मुक्या भावनांनचे शब्द होतात, आपसुक चार ओळींची कविता होते, एक गोष्ट मात्र नक्की माझ्या असण्यापेक्शा, माझ्या नसण्यातच मी जास्त जगतो.

आठवणींची बात निघालीच तर मैत्री कशी मागे राहीन. -

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात


...आठवून पाहायचो मी काही पावसाळे मीत्रांच्या संगतीत भिजलेले, हवेभोवती गंध घेवून रानोमाळ पसरलेले, जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी गुलाबी स्वप्नातून जागवणारी , नुसतीच मग एक निरर्थक धडपड अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. दाटलेलं धुकयाचे मग सावकाश पाझरणे अन "आठ्वणींचे" ओले होवून जाणे; एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी उगीचचं भरुन येते माझी गोठलेली "पापणी".

मैत्री म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, कुठल्याही स्थितीत तरुन जाणा~या लवचीक वेली सारखी, कुठेही दडली तरी चमकणार्‍या हिर्‍यासारख अस्तित्व दाखवणारी.

पण मी खुप भाग्यवान आहे, खुप चांगले मीत्र मीळालेत मला. तसे तुम्हा सर्वाना मीळो हिच सदिच्छा.