Tuesday, March 4, 2008

मी यातला नाही !!

मी विसरलो नाही; की घेतला वसा मी मातलो नाही
चालतोय ज्या वेळेतुन फ़क्त वेळ ती माझी नाही...


मी सोसले बरेचसे.. उगा मी काहीही सोसणार नाही
पोटसाठी केवळ मी माझ्या आत्म्यास बाटवणार नाही


आग लागलीय काळजाला..म्हणुन लंका मी जाळणार्यातला नाही
भोगुदेत कर्माची फ़ळे तयांना..मी माझे कर्म दूषीत करणार नाही


रखरखते अतीत; म्हणुन भूतकाळाच्या जखमां पाहुन रडणार नाही .
सरतील वाळवंटे कोरडी...म्हणुन मी सागराचे पाणी भरणार नाही.


मी जगतो "उद्या"साठी.. म्हणुन कसेही जगावे यातला मी नाही
न पाहीलेल्या भविष्यासाठी मी माझे वर्तमान डावलणार नाही



---
मंदार

1 comment:

fried water said...

great poem ...
vidamban was really nice piece of work i guess sandip wont mind...