Thursday, March 20, 2008

आज पून्हा ती बात झाली !!

आज पून्हा ती बात झाली
सांज ती पून्हा अंधारुन आली ;
हसलो तरी अश्रू फ़सवूनी गेले
तूझ्या आठवांची बरसात झाली ।
.
मैफ़िलीत तुझीया जे सजवीत गेलो
गीत तेच मज लपेटून आली
टाळीले जरी तयांना दूर मी लोटीले;
आज पून्हा तीच माझ्या गळा दाटली ।
.
स्पर्शातून, गाण्यातून वा कवितेतून मांडली
आठवणीनी त्या आज पून्हा साजीश केली
शोधतो आजही तूझ्या अस्तित्वाचे पूरावे;
आशा ती सारी डोळ्यातून वाहून गेली ।
.
अखेरच्या क्षणी तीची भेट झाली
अडल्या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळाली ;
विसरण्या दुनीयेस आता विसरून जातो
अलविदा म्हणण्याची आता वेळ झाली
.
आज पून्हा ती बात झाली,
बरखा ती आज पून्हा घुसमटून आली
उमगले तीलाच फ़क्त बंध दोन्ही मनांचे;
संगे आमच्या आज ती ही बरसून गेली ।
.
आज शेवटची ती बात झाली,
दोन अश्रू माझ्या राखेवर सांडुन गेली,
व्यर्थ न गेले मरण माझे;
प्रीत ती सार्या जगतास दावून गेली ।
.
--------
मंदार हिंगणे
२०/०३/२००८

2 comments:

saurabh V said...

Chaan ahe.

gazal Chaan aahe. avaDali.

BTW tu "baraha" vaparatos kaa marathi saThi? tase asel tar "r^yaa" ase type keles tar " "sarya" jagatas davun geli!"
he neeT lihita yeil. "^" khuN tula varati 6 chya key var miLel.

karun bagh shivay Dnyaneshvari madhala "dnya" tula type karayacha asel tar "j~j" asa lihayacha. "~" hee khuN tula varachya 1 no> chya key shejari miLel.



Saurabh Vaishampayan.
spayan25@gmail.com

mandarhingne said...

arre thanx yarr ...

me tya khuna kadhichya shodhat hoto ..

thanks for reply .. :)