Tuesday, March 4, 2008

मी कविता करत नाही !

न ठावे कशी कविता-चारोळी ..अन मज गझलही कळत नाही
कागदांवच्या काळ्या रेघोट्यांना मी कवीताच म्हणत नाही


लीहतो ते फ़क्त भाव मन-आकाशी अवघडलेले,
छंद अलंकाराची जाणीव मज कधी झालीच नाही


चारोळ्या अन कविताही तीच माला शिकवीते
अक्षरांचे गीरवीणे माझे. ती शायरी मझी नाही..


अनेकदा लेखणीही सांगे... मान वर करु नकोस काही
शपथ तुला माझी .. संपेपर्यंत खाली ठेवायचेस नाही


"तिच" उतरवते भाव मनीचे..ती कल्पना माझी नाही
संवेदना विरोनी गेल्यात.. आलापना ही माझी नाही


शब्द जुळुनी ओळी तयांच्या कवीता होतात
लीहीतो फ़क्त मी .. मी रचीता तयांचा नाही


मी खरच कवी नाही अन कवीता ही करत नाही
गळ्याशपथ सांगतो मित्रांनो मी कविता करत नाही



-------
Mandar Hingne
01/09/2007

3 comments:

मोरपीस said...

आपण कविता करत नाही, परंतु ही कविता फ़ारच छान आहे

aditi mandlik said...

sahiye re!! purnach bolg zakkas zalay ho kaviraj..!!

Chitra Indalkar - Chaudhari said...

न ठावे कशी कविता-चारोळी ..अन मज गझलही कळत नाही
कागदांवच्या काळ्या रेघोट्यांना मी कवीताच म्हणत नाही

लीहतो ते फ़क्त भाव मन-आकाशी अवघडलेले,
छंद अलंकाराची जाणीव मज कधी झालीच नाही


hey Mandyaa lay bhari lihalas bagh..... ekdam jakaas.... jam aavadal bagh....... tu kavitaa naahi lihalis tari jhalel ... pan as bhari bhari lihit jaa re....