आज काही केल्या काहीच आठवले नाही,
क्षण एक वाटले..तूला विसरलो तर नाही ?
म्हटलं आठवातून गेलीस ते बरच झाले
अता स्वतास ओळखण्याचे कारण उरले नाही !
आयूष्यभर मी जगण्यापासून दूर राहीलो
तूझ्या सुखासाठी तुझ्यापसून दूर राहीलो
याहून मोठी सजा ती असणार काय ?
शरीर बनून प्राणापासून दुर रहीलो
जेव्हा कधी तुला भेटण्याची वेळ चालून आली,
तू दिल्या शपथांची बेडी आडवी आली
आठवणीत तूझ्या आजही पाणावतात डोळे
प्रत्येक अश्रूत फ़क्त तूच नजर आली.
कदाचीत विसरशील त्या धूंद क्षणांना
पण मला विसरणे तुझ्या प्रारब्धात नाही
झालीच ईच्छा तर कधीही आजमाऊन बघ ;
विसरशील स्वताला पण मला नाही
अशीच सरतील कैक वर्षे ह्या जगराहाटीत
असू आपण वयाच्या त्या अंतीम पडावावरही ;
येईन मी नक्की तेव्हाही जाणून घ्यायला
की तू सुखात तर आहेस की नाही ?
----
मंदार हिंगणे
१२/११/२००८
Saturday, May 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment