Saturday, May 23, 2009

!! ती तूझी माझी प्रीत ग !!

छेडीला साज तू
एक नवा आज तू
फ़ुलले प्रेम रुतू
दे मला साथ तू

लाजता तू अशी.
खळ्यात पाडशी ..
घेत जरा मिठीत ग..
श्वासांनी बोल तू ...

ऎक जरा साजणे
आवर तूझे लाजणे
तोडूनी बंध ते
हो मुक्त बेभान तू

होताच स्पर्श तो
शहारले अंग ग
बाहूंचे पाश ते
उधळती रंग ग....

मुक्त बेभान हा
पाऊस सांडतो
थांबण्या तव देहावरी
थेंब थेंब धावतो....

होई फ़ुलांचे अंतर
आपूल्या मिलनात ग
रक्तातून उसळती
तूझी माझी प्रीत ग..

ती तूझी माझी प्रीत ग

----
मंदार हिंगणे
22-05-2009

No comments: