सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता. न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?" त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला" .
माझे ही असेच आहे काहीतरी , जगा आणि जगु द्या यावर माझा विश्र्वास आहे. खर तर माणसाने झाडासारखे असावं; झाड कधिच सुखासुखी वठत नाही, ते नेहमीच ओलावा शोधत राहतं; तेच खरं खरं प्रेम करत जिवनावर. मग ते जिवन कितीही विरुप कितीही वेडेवाकडे वा कितीही विद्रूप असु द्यात. म्हणुनच म्हणतो - माणसानं झाडासारख वागावं, कारण मृत्युनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते.
जी माणसे हवीशी वाटतात ती कधी भेटत नाही आणि जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याकडे जावेशे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही आणि ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावेच लागते. जेंव्हा जीवन नकोसे वाटते तेंव्हा काळ संपत नाही, जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो पण तेंव्हा काळ संपलेला असतो. नशीब हे असच असते त्याच्याशी जरा जपून वागाव लागतं तिथे कोणाचेच चालत नाही जिकडे नेईल तिकडे जावेच लागत. अशावेळेस फुले आपल्याला बरेच काही शिकवतात......,
गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं.
मी खरतर खुप खुप बोलायचे ठरवतो, माझ्या भावनांना शब्दात बसवायचं ठरवतो, चार ओळी जोडुन कवीता करायची ठरवतो; पण शब्द अबोल होतात,मन मात्र बोलयला लागत मग आठवणीशी भांडण होतं. कधीतरी नंतर मग मुक्या भावनांनचे शब्द होतात, आपसुक चार ओळींची कविता होते, एक गोष्ट मात्र नक्की माझ्या असण्यापेक्शा, माझ्या नसण्यातच मी जास्त जगतो.
आठवणींची बात निघालीच तर मैत्री कशी मागे राहीन. -
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात
...आठवून पाहायचो मी काही पावसाळे मीत्रांच्या संगतीत भिजलेले, हवेभोवती गंध घेवून रानोमाळ पसरलेले, जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी गुलाबी स्वप्नातून जागवणारी , नुसतीच मग एक निरर्थक धडपड अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. दाटलेलं धुकयाचे मग सावकाश पाझरणे अन "आठ्वणींचे" ओले होवून जाणे; एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी उगीचचं भरुन येते माझी गोठलेली "पापणी".
मैत्री म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, कुठल्याही स्थितीत तरुन जाणा~या लवचीक वेली सारखी, कुठेही दडली तरी चमकणार्या हिर्यासारख अस्तित्व दाखवणारी.
पण मी खुप भाग्यवान आहे, खुप चांगले मीत्र मीळालेत मला. तसे तुम्हा सर्वाना मीळो हिच सदिच्छा.
Friday, February 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Madar.......
I am speachless... khupach sundar lihal aahes..... bhavanaana shabdaat utaravan khup chan jamal aahe.....
Post a Comment