Tuesday, June 9, 2009

मन वेड्यागत का होते?

.कसे सांगू की आज
मन वेड्यागत का होते?
जे म्हणावे आपलं
ते परकं का होते?

करी तू सहज इशारा
असा जाता जाता
ही तूझीच अदा,
मन माझे फ़िदा का होते ?

पहावे तूला एकटक
वाटे क्षण क्षण पहात राहावे
न दिसता तू क्वचीत,
मन बावरे का होते?

रंग सारे निसर्गाने
रूपात तूझ्या सजवीले होते
गंध, फ़ूले नी फ़ूलपाखरे
सांग तूझवरी रूसली का होते?

सजले दिवे तारंकांचे
उमळोन चंद्र ही आला
आसमंती मैफ़िलीत त्या
सूर तूलाच शोधत का होते?

चालतांना मी एकटाच
धूंद धूक्यातली वाट
मला नित्य वेढणारे
तूझेच भास का होते?

न शक्य अताशा
तूझवाचून जगणे माझे
अता डोळ्यात माझ्या
मिलनाचे स्वप्न का होते?

-
मंदार हिंगणे
०४-०६-०९

No comments: