Friday, June 12, 2009

| हवीये तूझी साथ मला ।

खूप लांब आहे ही जिवनवाट
थोडी उसंत तूझपाशी हवीये मला
थोड दूरपर्यंतच का होइना
फ़क्त हवीये तूझी साथ मला ।

सारे आयूष्य नाही मागत
पण चार घटकाच मागतोय तूला;
त्या चार घटकांमधे जगण्यासाठी
हवीये तूझी साथ मला ।

धूंदीत आहे मी अन तू ही आहेस
मी तूझा नी तू माझी; हे क्षण दे मला;
अखेरचे एकदाच ह्या नशेत रमण्यासाठी
हवीये तूझी साथ मला ।

एका धूंद क्षणाची आहे भेट आपली
सोड उद्याची चिंता कशाला ?
फ़क्त अखेरचे ह्या वेळेत
हवीये तूझी साथ मला ।

अत्ता तर कूठे होतय कातरवेळ
चांदण्याही कूठे येत आहेत क्षितीजावर
फ़क्त शेवटचा चंद्र बघण्यात
हवीये तूझी साथ मला


--
मंदार हिंगणे
०४-०६-२००९.

No comments: