Wednesday, June 17, 2009

ही रात्र चांदण्याची

नूरलो एकटा आताशा
माझा इतूकाही मी
मनास आज तूझसमीप
जेव्हा होतांना पाहीले मी

आनंदे सांगू कसे तूला
न गगनात मावलो मी
काळ्या तूझ्या डोळ्यात
जेव्हा मलाच पाहीले मी

उमगले भाव मनीचे
न सांगता तू मला ही
आरक्त तूझ्या गालावर
जेंव्हा खंळीस पाहीली मी

जादुई ह्या क्षणाची
किती वाट पाहीली मी
अवचीत रीते झाहलो,
जेव्हा मिठीत शिरलो मी

मनातल्या चकोरास
ओढ शुभ्र चांदण्याची
अशी एकदाच का येते
ही रात्र चांदण्याची

ही रात्र चांदण्याची

-
मंदार हिंगणे
१६-०६-०९

No comments: