Friday, March 5, 2010

मी तुला पहात होतो

अंगणी प्रेमाचे सप्तसुर गातांना
झाडावरूनी अबोली तोडतांना
चोळी थोडी तटतटुनी येतांना
सये, लपुन मी तुला पहात होतो

मन धावले धुंद
विचार झाहले संथ
स्वर ते हळवे अंगणात पसरतांना
सये, मी गाणे ते ऎकत होतो

वर्ण ते साजीरे
सुंदर ते नाहलेले
सांजवेळी चमकतांना
सये, माडीवरुन मी तुला पहात होतो

हळुच अंगणी यावे
तुला मिठित घ्यावे
परी पाहुनी तुला लाजतांना
सये, पुन्हा मी दारात थांबत होतो


-
मंदार
(साद मनाची)

Shri Vi. Da. Savarkaranchya "Tanuvel" hya kavitevarun kahi suchale te lihile. Asha karto aapanas aawadel.

तुझ्या कारणे

.
आठवाना आठवावे असे नसते
तरी आठवून "आठवण" आठवतो
आठवात सवय जडली इतुकी,
न कळे असा मी कितीक आठवतो

आठवून आठवून आठवणार किती
मनाला का कधी असतात भिंती
स्वैर स्वैर वागणे आठवांचे
मारून मुटकून कोंडणार किती

न आठवणे कधी असे चांगले
न जमे मजला ते तसे वागणे
हताश मी पुरता अश्या आठवाना
तुला न ठावे, हे सारे तुझ्या कारणे



-
मंदार
२४-०२-२०१०

सार्थकता (Vinodi Kavita)

मोहोल्यात तुझिया येणे, न कधी सोडले मी
"नाही" म्हणालीस तरीही, पुसणे न कधी सोडले मी |

न एकटा मी, झाले लाख घायाळ येथे;
तुझ्या नजरेशी नजर देणे, न कधी टाळले मी |

किती कडक पहारा, भावांचा तुझ्यावरी हा
त्यांनी अनेकांना अनेकदा बुकलाताना पहिले मी |

मार खाण्यातही एकाला मी काही नव्हतो
मार खाउनी अनेकदा, फक्त वसा न कधी तोडला मी |

सार्थकता ह्या तपाची कधी अशीही व्हायची होती;
काय म्हणतेय ती पहा येथे, जे न कधी ताडले मी |

रे माकडा जा, जरा पहा चेहेरा आरशात खरा
पदवीस त्या ही, हृदयाशी कवटाळणे न विसरलो मी |

कळवळलो जरासा, अन निघालो माघारी
जातानाही अनेकदा वळून वळून तिला पहिले मी |

हे व्हावे असे, देवासही बहुदा मंजूर नव्हते काही;
पहा आली माकडीण मागे, अन पुढे पुढे चाललो मी |


--
मंदार
२३-०२-२०१०

आता सोडले मी

मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |


मंदार
२३-०२-२०१०

Wednesday, February 17, 2010

आठवणींचा डोह

.
अरे ! हे असले सगळे
भास का होतायेत ....
मनाची आस घेऊन
हे भावनांचे वारे का धावतायेत .

कोण आहे तिकडे,
कोण आहे इकडे
कोणाचा आवाज हा,
कुठून येतोय साज हा

तो पहा... तो पहा पुन्हा आला
उजवीकडून आला
डावीकडूनही आला
वर आकाशातही घुमतोय...
अन हे माझे चरा-चरही स्पंदन करू लागलीयेत
त्याच तालावर

कोण छेडतोय हा मल्हार,
दोर तर कुठेच दिसत नाहीये
पण, कोण ओढताय मला अलवार......

आवाज तर,
विलक्षण जीवघेणा गोड
तरल..
सांजेला पसर्णाऱ्या लाली सारखा
कोण गातंय असे,
का जीव वेडावतोय?
अन डोळे कुणाला शोधातायेत पुन्हा पुन्हा?

आताशा....
काहीच कळेनासे झालाय
त्या चहूकडे घुमणार्या आवाजाचे
त्या तरल सुरांची आवाजाची गळा मिठी पडतेय
ते गात्रांना उमगत नाहीये...

अनुभवतोय ते फक्त अस,
ह्या विलक्षण जादूचा डोह असावा....
अन धैवाताच्या किनार्यावरून फक्त झोकून द्यावे स्वतास तस...
बुडबुडा नाही,
तरंग नाही एकाही,
आणि खळबळही नाहीच..
सरळ गाठावा तळ...

हो डोहच तो,
तुझ्या गाण्याचा,
तुझ्या आवाजाचा,
तुझ्या सुरांचा
अन, पुन्हा पुन्हा मला खेचणाऱ्या
आणि तुझ्या अस्तित्वाचे पुरावे देणाऱ्या
तुझ्या "आठवणींचा डोह" ....

तुझ्या "आठवणींचा डोह" ....



-
मंदार
१६-०२-२०१०

Wednesday, February 10, 2010

तुझी आठवण ~~ 1 ~~ .

खोलीतील एकटा कि गर्दीतील एकटा
तर आम्ही बुवा गर्दीतले एकटे...
म्हणूनही कदाचित तुझी आठवण
नित नित सोबत करते मला

तशी तुझी आठवण येते
ह्यास काही काल वेळ नाही
जरा कुठे खुट्ट वाजल
तरी येते की तुझी आठवण

आठवांचा आवेग मात्र वेग वेगळा
जोर जास्त असलाच तर कविता होते..
नाही तर गालात हसून व डोळ्यात रडून आवेग ओसरून जातो

आत्ता तर तसा स्वताच्या असण्यात जगण्यापेक्षा
स्वताच्या नसण्यात जास्त जगतो मी त्याचा एकाचा फायदा असतो ...
तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी

तुझ्या आठवण्पासुना कधी दूर नसतो मी


-
मंदार
११-०१-2010

Tuesday, December 8, 2009

! फ़ुलराणी !

.
जी काल दिसली मला
फ़ुलराणी ती कुणी होती
नुर तीचा वेगळा नशीला
तीची नजर जादुई होती

कोण ती.. कुठली ती
मज प्रश्न असे नव्हते
एक अजीब होती सलगी
वाटे स्वप्न सामोरी होते

नाजुक ती ऎसी जैसे
फ़ुलपाखरु फ़ुलांवरले
देउनी रंग घेउनी गंध
तीने हे आसमंत धुंदवीले

आवरु कसा मी मला
मनावरी जोर नव्हाता
बांधु कसा मी इच्छेला;
ओढीस त्या दोर नव्हता

ती अशी रुप लेऊन आली
चांदणीचे रुप घेउन आली
गंधभारल्या तुझ्या श्वासांना
रातराणीही हुंगुन आली

जरा बावरलो जरा गोंधळलो
कोण देखणे कसे कळावे ?
फ़ुलराणी ही की परी देखणी
की संदर ह्या बागेतील फ़ुले

वेडे मन वेडे तन
शब्दही वेडावले अता
ये पुन्हा तू फ़ुलुन ये
हे जिवन तुजसाठी अता

शोधु कसे ती कुठे हरवली
सांगावा माझा देईल का कुणी?
नाजुक नवेली ती अलबेली
गेली मज वेड लावूनी......


--
मंदार (साद मनाची)
०८-१२-२००९