Tuesday, December 8, 2009

! फ़ुलराणी !

.
जी काल दिसली मला
फ़ुलराणी ती कुणी होती
नुर तीचा वेगळा नशीला
तीची नजर जादुई होती

कोण ती.. कुठली ती
मज प्रश्न असे नव्हते
एक अजीब होती सलगी
वाटे स्वप्न सामोरी होते

नाजुक ती ऎसी जैसे
फ़ुलपाखरु फ़ुलांवरले
देउनी रंग घेउनी गंध
तीने हे आसमंत धुंदवीले

आवरु कसा मी मला
मनावरी जोर नव्हाता
बांधु कसा मी इच्छेला;
ओढीस त्या दोर नव्हता

ती अशी रुप लेऊन आली
चांदणीचे रुप घेउन आली
गंधभारल्या तुझ्या श्वासांना
रातराणीही हुंगुन आली

जरा बावरलो जरा गोंधळलो
कोण देखणे कसे कळावे ?
फ़ुलराणी ही की परी देखणी
की संदर ह्या बागेतील फ़ुले

वेडे मन वेडे तन
शब्दही वेडावले अता
ये पुन्हा तू फ़ुलुन ये
हे जिवन तुजसाठी अता

शोधु कसे ती कुठे हरवली
सांगावा माझा देईल का कुणी?
नाजुक नवेली ती अलबेली
गेली मज वेड लावूनी......


--
मंदार (साद मनाची)
०८-१२-२००९

1 comment:

Shamli said...

Hi as usual very beautiful poems. .. Have been waiting since long for something new. . .Dont stop writing. .you have got a really good flair with Words. .
Keep updating. . .
Thanks n Regards-

Shyamli