Tuesday, December 8, 2009

महाभारत..कथा नाही सत्य आजचे

महाभारत
ही कथा नाही
एक आपलेच आणि
त्या हरएक युगाचे सत्य आहे
जेथे
बुरसटलेल्या सांस्क्रुतीक बेड्या,
डळमळलेला आशावाद,
मुल्यहिनता आणि भ्रष्ट समाजवाद
जिवनाचे मापदंड ठरतात..

जेव्हा ,
न्यायासाठी बंद असता ध्रितराष्र्टा चे डोळे
आणि जैसे ठेवली अनंते तैसेची राहाणे हा धर्म
जेथे,
आचार्य द्रोणाचार्‍यांचे कर्तव्य
पोट भरविण्यासाठी कोणापुढेही नतमस्तक होते

येथे तयार होते पार्श्वभुमी "महाभारताची"

जेथे
दुर्योधन आणि दु:शासन
हे खरे खलनायक नाहीच मुळी
ते तर फ़क्त बाहुले शकुनीच्या हातातले

जेथे,
कर्ण आणि एकलव्य
बळी ठरतात
एकाच व्यव्यस्थेचे
की जी गांधारी प्रमाणे
आपल्याच डोळ्यांनवर पट्टी बांधते

स्वताच्या अपमानाने डिचवलेली द्रौपदी
विसरून जाते की,
दुसर्‍यांच्या जाती आणि विकलांगतेवर
व्यंग करतांना
स्वत:च्याच संस्काराच्या उणीवा दिसतात..

आजही द्रौपदीला डावावर लावणारे
षंढ आजही समाजात वावरतात.

तर,
महाभारत
जी फ़क्त कथा नाही
सत्य आहे
कदाचीत
आपल्या ह्याच काळातले..नाही का?


--
मंदार

No comments: