Tuesday, December 8, 2009

रातराणी ..

.
सरत्या मैफ़िलीत कशी नादली गाणी
न कळे पुन्हा कशी गायली रातराणी

घेउन क्षण आठवांचे पाउल निघता निघेना
पकडुन हात घट्ट आज थांबली रातराणी

जडावल्या मनीचे गंध मिळाले श्वासांना
अखेर ओठांशी माझ्या स्पर्शीली रातराणी

सांगणार कसे, तीस शब्दांचीही साथ नाही
आवेगातच मजला बिलगली रातराणी

समजाऊ कसे तीला काही केल्या कळेना
अबोल संभ्रमात मलुल पडली रातराणी

शेवटची भेट ही मना हेलावुन गेली
बहरलेल्या ह्रुतुतही ही सुकली रातराणी

दु:ख नसे कुणा की, स्वप्न मिलनाचे अधुरे
पाहुनी अश्रु माझे ती पहा रडली रातराणी



---
मंदार हिंगणे
(साद मनाची)
२८-१०-२००९

No comments: