Thursday, October 8, 2009

तुझा "होकार"

प्रेमास कधी नसते
शब्दांची परीभाषा
कळले तुझ्या नजरेतले
आनंद अन आशा

होकारास तुझीया
शब्दांचे बंध नव्हते
डोळ्यांनीच वाचले मी
डोळ्यातील भाव होते

कोरडे कसे व्हायचे
भाव हे नित्यगंधीत
माझ्या श्वासात आहे
तुझ्या श्वासाचे संगीत

शब्दातीत आहे
हा खेळ सारा
मिलनास आपल्या
साक्षी आसमंत सारा

ओठांवरला होकार जेव्हा
तुझ्या नजरेत दाटत होता
माझ्या ही डोळ्यात तेव्हा
अबोलपणाचा पाऊस होता

--
मंदार (साद मनाची)
०७-१०-२००९.

No comments: