Tuesday, December 8, 2009

आणि जिवन जिंकत गेले

कोण बघतय कुणाची वाट ?
झाडाने बघीतली
फ़ळा फ़ुलांची वाट ?
फ़ळांनी चिमुकल्या रोपांची वाट?
अन जमीनीच्या गर्भातुन त्यांनी अंकुरण्याची वाट?
अश्या प्रत्येक वेळीस "जिवन" जिंकत आले ..

प्रेमास मिळाली सावली
प्रीयेच्या मस्ती भारल्या तारूण्यात.
तीच्या काळ्याभोर डोळ्यात ..
एका तान्हुल्याचे निष्पाप स्मित मिळाले..
आणि पुन्हा एकवार "जिवन" जिंकले..

उगवत्या सुर्याच्या पुन्हा मावळण्यात
चंद्राच्या चंचल विहरण्यात
रात्रीच्या अलवार तरंगात
आणि प्रात:काळच्या भुपालीच्या स्पंदनात
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकले .

साधकाच्या विशुध्द साधनेत
तापसाच्या कठीण तपश्चरेत
मॊनीच्या अबोल अवस्थेत
नि:सीम भक्तिच्या शब्दातीत भक्तिमधे
प्रत्येक वेळी "जिवन" जिंकत गेले


---
मंदार

1 comment:

Shyamlee said...

अतिशय सुदंर कवीता आहेत. . मनाला कुठेतरी स्पर्शुन जातात. .