Thursday, October 8, 2009

तुझा "होकार"

प्रेमास कधी नसते
शब्दांची परीभाषा
कळले तुझ्या नजरेतले
आनंद अन आशा

होकारास तुझीया
शब्दांचे बंध नव्हते
डोळ्यांनीच वाचले मी
डोळ्यातील भाव होते

कोरडे कसे व्हायचे
भाव हे नित्यगंधीत
माझ्या श्वासात आहे
तुझ्या श्वासाचे संगीत

शब्दातीत आहे
हा खेळ सारा
मिलनास आपल्या
साक्षी आसमंत सारा

ओठांवरला होकार जेव्हा
तुझ्या नजरेत दाटत होता
माझ्या ही डोळ्यात तेव्हा
अबोलपणाचा पाऊस होता

--
मंदार (साद मनाची)
०७-१०-२००९.

ते दाट धुकं

शांत.. निर्मळ.. संथ.. अलवार
तरी चहुकडे आपल अस्तित्व ठेउन असणारं
दुरवर पसरलेल्या निळ्या आकाशाखाली
तुझ्या मिठीची अनुभुती देणार....... ते दाट धूकं

त्याच धुक्यांच्या बाहुत गुरफ़टणारा मी
आणि माझ्या हातातली थरथरणारी लेखणी
काही लिहण्याच्या आधीच तीथे शब्द थांबत होते
असं का ? माहीत नाही, पण असे करवणारं...... ते दाट धुकं

एक वेगळेच स्वप्न तीथे आकार घेत असतं
अन त्याला स्पर्श करवा म्हणुन हात पुढे करतो
पण हातात येण्या आधीच तो आकार विरळ होत जातो
असाच पाठशिवणीचा खेळ खेळणार..... ते दाट धुकं

ते दाटलेले धुकं ... ते दाट धुकं



--
मंदार (साद मनाची)
०६-१०-२००९.

राधेय म्हणा वा कौंन्तेय

दैवजात दु:खे असते
दोश का कुणाचा
शुद्र म्हणवीती लोके
जरी पुत्र क्षत्रीयाचा

जसे भाग्य माझे
तैसाच भोग कन्हैयाचा
पुत्र देवकीचा आठवा
म्हणवीती कान्हा यशोदेचा

जन्मताच परीत्यक्त दोघे
आम्ही आमुचीया नशिबाने
फ़रक तो कोठे आला
का नच मजसी स्पर्श कुलत्वाचा

हिणवती लोके मजला,
जरी हेवा तयासी कुंडलाचा
कपटे याचक बनोनी आला
तो देव कोणत्या कुळाचा

माझे जिवन होते माझे
अभिमानी मी जरी पुत्र सुताचा
नको असले कुल क्षत्रीय
जयांचा आत्मा किल्मिषाचा

राधेय म्हणा वा कौंन्तेय
मझला, अंश मी तेजाचा
सुर्यपुत्र मी नसे सुतपुत्र
जरी मी शापीत दैवाचा


--
मंदार

एक आशा... तु पुन्हा भेटण्याची

.
तु कवीता आहेस माझी
शब्दात, अर्थात
अन ओळींमध्ये तुलाच बघतो मी
पण तु येतेस
आणि लगेच निघुन जातेस
अगदी एखाद्या चारोळी सारखी

अन मग मी बसतो.
तुझ्या आठवणी रंगवत.
तुझ्या थोड्याश्या अस्तित्वाने ही
भारवुन गेलेल्या पाना फ़ुलांवर कवीता करत ..

आणि वाट पहात राहतो की, पुन्हा कधीतरी
भाव डोळ्यातील उलगडतील
स्पर्शातून, गाण्यातून वा एखाद्या कवितेतून ।
ते तुझ्या अस्तित्वाचे पुरावे आहेत;

आणि मांडतोय हा प्रपंच निदान ह्या आशेवरून ।


--
मंदार (साद मनाची)
०३-१०-२००९

Wednesday, October 7, 2009

। आज ना उद्या ।

.
प्रेमात तु पडणार आज ना उद्या
माझी तु होणार आज ना उद्या

ओठ अबोल, अन हे डोळे बोलके
गालावर खळी येणार आज ना उद्या

घे सखये तु फ़ुलुन घे, रुतु सजले
प्रेम तराणे, रंगणार आज ना उद्या

लपवीलेस कितीक, तु भाव मनीचे
गुपीत हे, उलगडणार आज ना उद्या

तुझीच आस, मी थांबीन चातकापरी
जल देता मेघ, निववीणार आज ना उद्या

गुंफ़तो तुझेच रुप, शब्दात माझ्या
गीत माझे, तु गाणार आज ना उद्या

--
मंदार (साद मनाची)
२९-०९-२००९.

तीचा हाच "वेडेपणा"

वाट पाहत असतेस तु
नेहमीच्याच पारावर ...
जरा उशीरानेच पण मला येतांना बघुन
तु धावत येऊन मिठीत घेतेस..
चार अश्रु ढाळुन मोकळी होतेस..
धुवांधार पाऊस पडत असतो
छत्री असते.. पण तु ती उघडु देत नाहीस..
तुझी ओढणी च अर्धी अर्धी डोक्यावरुन घेतेस.
आणि बाहुला कवटाळुन..
आपण चालु लागतो..
... लोक हे सगळ पहात असतात.
जळतात मेले, पण नाव ठेवतात ..
म्हणतात
सोडली ह्यांनी लाज अन
चालवला काय हा वेडेपणा...
किव येते असल्या लोकांची
असल्या जळपट मेल्यांना कोण सांगणार?
की,

तीचा हाच "वेडेपणा" माझ्या जगण्याची ताकद आहे.

--
मंदार (साद मनाची)
२४-०९-२००९.

जाब

माझी कवीता फ़क्त तुझ्यासाठी
त्यातली ओळ न ओळ...
शब्द न शब्द फ़क्त तुझ्याचसाठी
त्या कवीतेचा अर्थ ..
फ़क्त तेवढा राहु दे मजपाशी..
तु तर जाशील निघुन ..
मान मुरडुन ... तुडवुन मला
त्यास हरकत नाही माझी
पण एक सांग मला..
जिने तीचे रक्त सांडलय तुझ्यासाठी ..
त्या लेखणीस मी काय जाब देऊ

त्या लेखणीस मी काय जाब देऊ

--
मंदार (साद मनाची)
२२-०९-२००९

एकांत

कधी कधी
एकांत माझा गुणगुणायला लागतो..
त्या पाण्यावर पसरणार्‍या रेषांसारखा
अलिप्त.. शांत.. तरीही,
सरोवराच्या गर्भातली खळबळ सांगणार्‍या तरंगासारखा..
तुझ्या आठवांचा एक खडा टाकला..
की लगेच त्याचे साद पूर्ण सरोवरभर पसरणार..
तरंग थांबताच ....एक शांतता..शून्यात नेणारी.

अन मग पुन्हा एकवार एक आठवण
त्या पाण्यात जाऊन पडणार ......
मनाच्या सरोवरात खळबळ करणारी. .
कुठेतरी थांबवायचा हा खेळ
म्हणून मग मी उठून चालू लागतो..
पाऊल थकल्यावर जरा बसतो निवांत..
नेमकी तिथेच कुडीतील इंद्रिये कुरकुरायला लागतात

कारण,
तोच तरूचा पार असतो..
तीच असते दिवेलागण..
सारी सारी तिचीच देतात आठवण
आणि ओरडून सांगत असतात..
आज पौर्णिंमा..
तरी तुझा चंद्र आभाळी नाही ...

--
मंदार (साद मनाची)
१७-०९-२००९.

थांब सखये, तू थांब अता (2)

वळून पाहशी, तू का जाता
थांब सखये, तू थांब अता

थांब प्रीये, ग थांब साजणी
तूझ्याचसाठी, ही गातो गाणी
साथ दे तूही, माझीया सादा - १

सांज ही बघ, येई फ़ूलोनी
नभी नक्षत्रे, येती उमलोनी
खूले ही मैफ़िल, तू जरा लाजता - २

तव तेजाची, न्यारी किमया
तूझीया रंगी, ही रंगे दूनीया
चांद ही लपला, ग तूला पाहता - ३

गौरवर्णी बाला, तू शोडष वर्षा
त्रूषार्त मी, सये तूझीया स्पर्शा
ही आस मनीची, नव्हे वासना - ४

बेधूंद जाहलो, मी तूला पाहूनी
मन बावरे हे, तूला समर्पूनी
स्विकारी वा फ़ेकावे, ते तूझ्या हाता - ५

नच विनोद हा, सत्य एक हेची
सये ह्रुदयी माझ्या, आहे एक तूची
जगणे तूजवीण, शक्य नसे अता - ६

--
मंदार (साद मनाची)
१०-०९-२००९

थांब सखये, तू थांब अता (Sad)

वळून पाहशी का तू जाता
थांब सखये, तू थांब अता

थांब प्रीये, थांब साजणी
ऎक एवढे गाणे माननी
मम आयूष्य तूझीया हाता - १

जिवनगाणे नयनी दाटले,
स्वप्न दिवाणे कसे भंगले
दैवे लिहीले वियोग माथा - २

नभी जमती चित्रे काळोखी
सागरासही मग येईन ओहटी
झणी थांबेल प्रूथवी फ़िरता - ३

सूख दूख्खे नित्य अकल्पित
मागणे एक सये तूला फ़क्त
राहू दे तव हात माझीया हाता - ४


--
मंदार (साद मनाची)
०८-०९-०९

विडंबन- दारूड्या मयवरा (मदीरापान ५)

सह्र्दय गदिमां ची माफ़ि मागून .... ।

मूळ गीत:
नको करुस वल्गना रावणा निशाचरा !
समूर्त रामकिर्ती मी न्यात हे सूरासूरा..

विडंबन :
नको करूस वल्गना दारूड्या मयवरा !
सर्व जगमान्य ती न्यात घे निशाचरा

झिंगण्यास योग्य ती परकाया प्रवेशता
घोट घे तू माणसा झणी फ़िरून एकदा
लाज राख दारूची चिंग तू जरी खरा

जिथे तिथे दिसे मला लोकमान्य जाम तो
स्वप्नी ये उशातळी मदमस्त धाम तो
कल्पनेत पूजीतो त्याच एक मय-करा

योग्य अनेकास ती, मानले तीच्या गूणा
परत जातो धूंद मी मयशाळेस एकदा
तरणे ज्यात डूंबूनी एक ही तीची अदा

घोट घेता अंतरी, उसळते ही दामीनी
भडकते आस ती उदरात ओतूनी
जा तरी पीत तू घेउनी तूझ्या करा

नयनबाणही कधी चूकेल घाव घालीता
क्षणही होश ना तूला दारू हीच प्राशीता
भूलवी तूला अशी जणू जादू की मंतरा

ठाकता तूझ्यापूढे छंदमूक्त जाम तो
ठेवणार होश ना असा मस्त बाण तो
तरल जामधूंद तू, विचार हा करी जरा

बघेन धूंदजाम मी बेवड्या तूझ्या मूखा
मूक्त पंख लाउनी उडसी तू सूखीसूखा
भारमूक्त होऊ दे एकवार अंतरा

--
मंदार
25-08-09

तूझ्या धूंद साथीत (मदिरापान-४)

प्याला वर प्याले
प्रीये असेच भरू दे
तूझ्या धूंद साथीत
रात्री अश्याच सरू दे

भरू रकाने रात्रीचे
एकांत निवांत ठरू दे
मैफ़िल ही प्रेमाची
अशी उत्तरोत्तर रंगू दे
तूझ्या धूंद साथीत
रात्री अश्याच सरू दे

एकच प्याला दोघांसाठी
धूंदी दारूची वाढू दे
राहू कसा अबोल मी
शराब शब्दांची भरू दे
तूझ्या धूंद साथीत
रात्री अश्याच सरू दे

-
मंदार हिंगणे (साद मनाची)
२२-०८-०९

शराबी इतकी शराब का पीतो (मदिरापान-३)

शराबी इतकी शराब का पीतो?
न थोडकी खूप सारी का पीतो?
उमजते पीणे असे न चांगले
मग ईतकी खरब का पीतो?

जखमाच अश्या मिळाल्या की
न पीले तर मेलो असतो
आधार प्यालाचा नसता
तर कधीच विखूरलो असतो

लपून ढाळले अश्रू कितीक
उघडपणे आज ते पीतो
शराबी इतकी शराब का पीतो?
न थोडकी खूप सारी का पीतो?

आता सूकले डोळ्यातील पाणी
आठवात वाहीली रक्तांची गाणी
अशी चूक ती काय माझी
नशिबात लिहली दैवाने विराणी

काहीसे आहे असे नक्किच
लपवीण्यास ते तो शराब पीतो..
शराबी इतकी शराब का पीतो?
न थोडकी खूप सारी का पीतो?

--
मंदार हिंगणे (साद मनाची)
२१-०८-०९

हो हो मी पीतो (मदिरापान-2)

प्यायला मी घाबरत नाही
बिनधास्त पीतो..
कूणी टवकारले डोळे..
तर लटपटत पीतो...

प्रेमीजनां समोर पीणे नको
हा तसा बेवड्यांचा स्थाइभाव
करून सवरून लपवीणे
हा तर निव्वळ अहंभाव

सूरक्षीततेच्या नावाने
मनात नूसती चलबीचल
दिसताच सामोरी बाटली
दिलात होते गडबड

असेल जर खरे हे तर
उगाच कशाला लाजायचे?
सूटलाच जर निश्चय
तर सरळ जाऊन प्यायचे..

स्पर्श होताच लाजळू
पान मिटूनी घेते
मावळतो रवीराजा
अन फ़ूल कोमेजते

लाजळूने लाजावे
फ़ूलाने कोमेजावे
ह्यास का दोस्तांनो
कूणी पाप म्हणावे?

पीणे हा बेवड्यांचा तर
चिरंतर स्वभाव...
बहाणा एक पूरे
मग नाही ठहराव..

पीणे नाही जिवनात
मग जगता कशाला
रस्ता ओलांडतांना
सिग्नल बघता कशाला?

जमेल तीतके प्यावे
उरलेच तर बाकीच्याना द्यावे
पीण्यासाठीच जन्म आपूला
उगा का प्यासे मरावे?

म्हणोत कूणी "बेवडा"
परी नाही चिडायचे
हो हो पीतो मी
असे छाती ठोकून सांगायचे...

--
मंदार (साद मनाची)
२१-०८-०९

मी झालो मदिरा (मदिरापान-१)

मी झालो मदीरा
प्याल्या पाल्यातून रंगण्यासाठी
संपवीते मी स्वताला
तूटल्या दिलास जगवीण्यासाठी

जग म्हणे मला खराब
अन म्हणती कवी शराब
एकवार ओठांशी सजवा;
झाल्या जखमा विसरण्यासाठी

आग असलेले कधी पाणी
कधी मी बनते रातराणी
कवींच्या कवीता मी
अन सावरते तूट्ल्या दिलाची कहाणी

प्रत्येल मूलखाची मी
अन लखो दिवाणे माझ्यापाठी
हरएक धर्माची जान
मी अन सजती मैफ़िली माझ्यासाठी

नका झिडकारू मला
उगा का करती बदनाम
निट बघा वेड्यांनो,
देव ही करती सोमरसपान

--
मंदार
२२-०८-०९