Wednesday, October 7, 2009

। आज ना उद्या ।

.
प्रेमात तु पडणार आज ना उद्या
माझी तु होणार आज ना उद्या

ओठ अबोल, अन हे डोळे बोलके
गालावर खळी येणार आज ना उद्या

घे सखये तु फ़ुलुन घे, रुतु सजले
प्रेम तराणे, रंगणार आज ना उद्या

लपवीलेस कितीक, तु भाव मनीचे
गुपीत हे, उलगडणार आज ना उद्या

तुझीच आस, मी थांबीन चातकापरी
जल देता मेघ, निववीणार आज ना उद्या

गुंफ़तो तुझेच रुप, शब्दात माझ्या
गीत माझे, तु गाणार आज ना उद्या

--
मंदार (साद मनाची)
२९-०९-२००९.