Thursday, October 8, 2009

राधेय म्हणा वा कौंन्तेय

दैवजात दु:खे असते
दोश का कुणाचा
शुद्र म्हणवीती लोके
जरी पुत्र क्षत्रीयाचा

जसे भाग्य माझे
तैसाच भोग कन्हैयाचा
पुत्र देवकीचा आठवा
म्हणवीती कान्हा यशोदेचा

जन्मताच परीत्यक्त दोघे
आम्ही आमुचीया नशिबाने
फ़रक तो कोठे आला
का नच मजसी स्पर्श कुलत्वाचा

हिणवती लोके मजला,
जरी हेवा तयासी कुंडलाचा
कपटे याचक बनोनी आला
तो देव कोणत्या कुळाचा

माझे जिवन होते माझे
अभिमानी मी जरी पुत्र सुताचा
नको असले कुल क्षत्रीय
जयांचा आत्मा किल्मिषाचा

राधेय म्हणा वा कौंन्तेय
मझला, अंश मी तेजाचा
सुर्यपुत्र मी नसे सुतपुत्र
जरी मी शापीत दैवाचा


--
मंदार

No comments: