वाट पाहत असतेस तु
नेहमीच्याच पारावर ...
जरा उशीरानेच पण मला येतांना बघुन
तु धावत येऊन मिठीत घेतेस..
चार अश्रु ढाळुन मोकळी होतेस..
धुवांधार पाऊस पडत असतो
छत्री असते.. पण तु ती उघडु देत नाहीस..
तुझी ओढणी च अर्धी अर्धी डोक्यावरुन घेतेस.
आणि बाहुला कवटाळुन..
आपण चालु लागतो..
... लोक हे सगळ पहात असतात.
जळतात मेले, पण नाव ठेवतात ..
म्हणतात
सोडली ह्यांनी लाज अन
चालवला काय हा वेडेपणा...
किव येते असल्या लोकांची
असल्या जळपट मेल्यांना कोण सांगणार?
की,
तीचा हाच "वेडेपणा" माझ्या जगण्याची ताकद आहे.
--
मंदार (साद मनाची)
२४-०९-२००९.
Wednesday, October 7, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment